आजोशी-तिसवाडीतील खाजन बांधाला भेगा; पुनर्बांधकामांकडे दुर्लक्ष

पावसाळ्यात गंभीर परिस्थितीची शक्यता, घरांनाही धोका
Khajan
KhajanDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडीतील खाजन शेतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सांतआंद्रे मतदारसंघातील खाजन शेतीच्या समस्येवर निवारण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्यावर काही तोडगा निघत नाही.

आता उलट आजोशी येथे दुरुस्ती करण्यात आलेल्या बांधला पुन्हा भेगा पडून जवळपास एक महिना उलटला, तरी पुनर्बांधकाम झालेले नाही. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

ओजोशी खाजन जमिनीचे कारभारी शेंट मॅथ्यू टेनंट संघटनेने सुमारे १२ लाख रुपये खर्च करून याच वर्षी हा बांधाची दुरुस्ती केली होती. तिसवाडी मामलेदारांच्या निरीक्षणाखाली हे काम झाले होते.

परंतु अवघ्या काही महिन्यात बांधला त्याच ठिकाणी पुन्हा भेग पडल्याने केलेल्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. या बांधाला मोठी भेग पडल्याने नदीचे पाणी शेतात शिरून आता लोकांच्या घरापर्यंत आणि रस्त्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून पाणी रस्त्यावरून वाहणार असल्याने चिंता वाढली आहे.

Khajan
Margao Municipal Council: न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांची नगरसेवकांकडून सतावणूक

बांधाला भेग पडल्यानंतर पुनर्बांधणीसाठी शेंट मॅथ्यू टेनंट संघटनेकडून प्रयत्न झाले होते. परंतु ते विफल ठरल्याने संघटनेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला होता, मात्र महसूल खात्याने तो मान्य केलेला नाही.

बांधाचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने हा प्रकार वारंवार घडत असावा. येथे आता कोंक्रीट घालून बांधकाम करण्याची आवश्यकता आहे, कारण दगड घातल्याने पाणी आता शिरून माती वाहून जाते आणि हा भेग पडतो, असे मत शेंट मॅथ्यू टेनंट संघटनेचे अध्यक्ष जेफेरीन यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

लेखा परीक्षणाची सूचना

आम्ही संघटनेचे पैसे वापरून हे बांधकाम केले होते, परंतु अवघ्या काही महिन्यातच ते पुन्हा वाहून गेल्याने दुख झाले आहे. आता मामलेदारांनी याचे लेखा परीक्षण करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार हे काम हाती घेतले आहे, मात्र येथील खाजन शेतजमीन पूर्वीप्रमाणे करण्यासाठी सरकारकडून मदत लागणार आहे, असे जेफेरीन यांनी सांगितले.

Khajan
Porvorim: वीजेच्या झटक्याने पर्वरीत गाय दगावली, काँग्रेस म्हणते गोहत्या प्रकरणी ढवळीकरांनी...

"बांधाला भेग पडल्याने धोका निर्माण झाला आहे. आता पुन्हा बांधकाम करण्यासाठी सरकारकडून जास्त प्रतिसाद मिळत नसल्याने मी अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. तो स्वीकारण्यात आलेला नाही. परंतु खाजन शेती वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, मात्र त्यासाठी सरकारकडून मदत आवश्यक आहे."

- जेफेरीन, अध्यक्ष, शेंट मॅथ्यू टेनंट संघटना

"पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधाचे बांधकाम होण्याची आवश्यक होती. आता पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी लोकांच्या घरात शिरण्याची आणि रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच सरकारने देखील या प्रकरणात आपले हात वर केल्याचे दिसून येते."

"किमान सिमेंटची पोती घालून भेगा पडलेल्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी तरतूद करण्याची गरज होती. सरकारकडे त्यासाठी आपत्ती व्यवस्थान पथक देखील आहे, परंतु काहीही केले गेले नाही."

- प्राध्यापक रामराव वाघ, उपाध्यक्ष, आप.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com