‘इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट प्लॅन’ लवकरच: रोहन खंवटे

बेकायदा व्यवसायांना चाप; पर्यटकांच्‍या सुरक्षेस प्राधान्य
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: किनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवसायांना ऊत आला असल्याचे मान्य करीत आता याविरोधात कठोर पावले उचलणार असल्‍याचा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला. गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. किनाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी ‘इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट प्लॅन’ आणणार असून किनाऱ्यावरील बेकायदा कृतींना आळा घालण्याबरोबर पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले.

(Crack down on illegal businesses in goa Priority to the safety of tourists)

Rohan Khaunte
बुस्टरबाबत राज्यात अनास्था; खासगी इस्पितळेही बेफिकीर

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे. मात्र, किनारी भागात मसाज सेंटर, वेश्याव्यवसाय, डान्स बार, अनधिकृत डेक आणि बेड सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद देऊनसुद्धा या बाबी सुरूच आहेत. या विरोधात आता मोहीम उघडली जाणार असून, किनाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी ‘इंटिग्रेट बीच मॅनेजमेंट प्लॅन’ येणार आहे. सुरक्षित किनाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

विश्वजीत यांच्या कृतीचे स्वागत

नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यभरातील बेकायदा जमीन व्यवहार, अनधिकृत बांधकामे याविरोधात जी मोहीम उघडली आहे, ती स्वागतार्ह आहे. त्‍यामुळे राज्याचा वारसा आणि सांस्कृतिक ओळख टिकून राहणार आहे. किनारी भागासह राज्यात असलेली अनाधिकृत बांधकामे पाडलीच पाहिजेत, असे मत खंवटे यांनी व्यक्त केले. राजकीय वरदहस्त आणि अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत, असे खंवटे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com