गोव्यातील सांताक्रुझ येथील फ्लॅटमध्ये पैशांच्या वादातून सहकाऱ्याचा खून

तिघे अटकेत तर एक फरार; जुने गोवे पोलिसांची कारवाई
Murder
MurderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांताक्रुझ येथील फ्लॅटमध्ये एकत्र राहत असलेल्या सहकाऱ्यांनीच उत्तम पटेल याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी तीन सहकाऱ्यांना रात्री उशिरा अटक केली. तर एकजण फरार झाला आहे. हा खून पैशांच्या वादातून झाला असल्याचे प्रथमदर्शनी तपास चौकशी उघड झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

उत्तम पटेल याच्यासह संशयित हे सांताक्रुझ येथील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. हे सर्वजण मोबाईल टॉवरसाठी केबल टाकण्याचे काम करत होते.

Murder
पणजीतील पराभव निराशाजनक मात्र...: उत्पल पर्रीकर

गेल्या शनिवारी (5 मार्च) फ्लॅटवर या सर्वांनी रात्री पार्टी केली होती. त्यावेळी त्यांच्यात कामाच्या पैशाच्या वादातून मद्याच्या नशेत बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यावसान उत्तम पटेल व देवेंद्र यादव यांच्यात झालेल्या मारहाणीत झाले. या मारहाणीनंतर उत्तम पटेल बेशुद्ध पडला. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी त्याच्या सहकाऱ्यांना वाटले नाही. सकाळी पटेल याला त्याचे सहकारी उठवण्यासाठी गेले असता तो हालचाल करत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती जुने गोवे पोलिसांना दिली.

विश्‍वजित नवले, चंदन मुखर्जी व शिवराम गोंड हे तिघे फ्लॅटवर होते तर देवेंद्र यादव हा भीतीनेच तेथून पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शव चिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला. मृतदेहावर मारहाणीची एकही जखम नव्हती. उत्तम पटेल याच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना गोव्यात येण्यास सांगितले. तोपर्यंत मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. काल पटेल याचे नातेवाईक आल्यावर पोलिसांनी त्यांच्या समक्ष मृतदेहाचा पंचनामा केला व शव चिकित्सा करण्यात आली.

Murder
गोवा खंडपीठाच्या निवाड्याला काँग्रेसचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

अगोदर अनैसर्गिक मृत्यूची नोंद

उत्तम पटेल याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली संशयित विश्‍वजित नवले (महाराष्ट्र), चंदन मुखर्जी (पश्‍चिम बंगाल), शिवराम गोंड (उत्तर प्रदेश) अटक केली आहे. तर देवेंद्र यादव (उत्तर प्रदेश) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. गेल्या रविवारी जुने गोवे पोलिसांनी पटेल याच्या मृत्यूप्रकरणी शवचिकित्सा झाली नसल्याने अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, आता न्यायवैद्यक डॉक्टरांनी त्याचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष अहवाल दिल्याने खुनाचा गुन्हा नोंद केल्याची माहिती दिनेश गडेकर यांनी दिली.

गळा आवळल्याची माहिती लपवली

पोलिसांनी या घटनेनंतर फ्लॅटवर असलेले पटेल याच्या तिघा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. तिघांनीही याप्रकरणी पुसटशी माहिती उघड केली. मात्र, त्याचा गळा आवळण्यात आल्याचे सांगितले नाही. या कटकारस्थानात त्यांचाही समावेश आहे या संशयावरुन पोलिसांनी अटक केली. संशयित देवेंद्र यादव याला अटक केल्यावर खुनामागील कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गडेकर हे उपअधीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com