Covide 19: गुळेली येथे कोवीड वॉरियर्सचा सत्कार समारंभ

त्याचबरोबर पोषक बाजार दिवस संपन्न
सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली येथे कोवीड वॉरियर्सचा सत्कार प्रसंगी गोविंदराय प्रभू , सत्कार मूर्ती व मान्यवर (Covide 19)
सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली येथे कोवीड वॉरियर्सचा सत्कार प्रसंगी गोविंदराय प्रभू , सत्कार मूर्ती व मान्यवर (Covide 19)दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

Goa: मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री गोविंदराय प्रभू (मॅनेजर नानू इंडस्ट्रीज) , सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. संजय गावकर( उपआरोग्य केंद्र वाळपई) , श्री उत्तम मेळेकर अध्यक्ष पालक शिक्षक संघ,मुख्य अतिथी समाजसेवक तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री प्रेमनाथ हजारे, सन्माननीय अतिथी शामराव देसाई, मुख्याध्यापक श्री सूरज नाईक उपस्थित होते. (Covide 19)

सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली येथे कोवीड वॉरियर्सचा सत्कार प्रसंगी गोविंदराय प्रभू , सत्कार मूर्ती व मान्यवर (Covide 19)
Goa: रस्त्यावरून गावची बदनामी नको

महिमा अणि साथी कलाकारांनी सुरेल संगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. शारिरीक शिक्षक सनी काणेकर यांनी करोना काळ व त्यावर समाजाने तसेच शाळेने केलेल्या कार्याची चित्रफित प्रदर्शित केली. शिक्षक दिलीप पालेकर यांनी कोवीड वॉरियर्स (Covide Warriors ) यांच्या सत्कार समारंभाची जबाबदारी पार पाडली. डॉ संजय गावकर, शिक्षिका तेजस्विनी नाबर , शिक्षिका मधुरा बेतकेकर, शिक्षक प्रविण कुडाळकर ,अजय गावडे, गोकुळदास पीरणकर, संगीता गावस ,नितेश देसाई यांचा कोवीड वोरीयर्स म्हणून सत्कार करण्यात आला. विद्यालयाचा माजी विद्यार्थी सडयो मेळेकर , पूजा मेळेकर यांना शालेय जीवनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाल व सन्मान प्रतीक देऊन गौरविण्यात आले. नितेश देसाई व पूजा मेळेकर मनोगत व्यक्त केले.

सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली येथे कोवीड वॉरियर्सचा सत्कार प्रसंगी गोविंदराय प्रभू , सत्कार मूर्ती व मान्यवर (Covide 19)
Goa: पेडणे ही राज्याची आदर्श सोसायटी; उपमुख्यमंत्री आजगावकर

संगीत शिक्षक नितेश देसाई, चंद्रकांत नाईक, कविता पिरणकर , कला शिक्षक प्रेमानंद च्यारी यांनी संगीत आविष्काराची संगीत मैफिल घडवून आणली . शिक्षिका शितल लाड हीन बाजार दिवसाचा उद्देश स्पष्ट केला. मुख्याध्यापक सूरज नाईक यांनी पोषक बाजार दिवसाचे उद्घाटन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मृदुला भावे व पूजा गावकर यांनी केलं. सर्व विद्यार्थी वर्गाने पोषक बाजार दिवस भाजीपाला ,फळ, खाण यांची विक्री करून साजरा केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री धाकटू नाईक यांनी केल.गौरव कार्यक्रम श्री शामराव देसाई यांच्या आर्थिक सहकार्याने पार पाडला .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com