Covid 19 JN.1 variant : कोविड पसरतोय; स्वयंप्रेरणेने काळजी घ्या! आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

Covid 19 JN.1 variant : पूर्वीसारखीच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करा
Corona|Covid-19| JN.1
Corona|Covid-19| JN.1Dainik Gomantak
Published on
Updated on

Covid 19 JN.1 variant : पणजी,राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने जनतेने स्वयंप्रेरणेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

कोविड काळात कोविड प्रतिबंधात्मक जी उपाययोजना केली जात होती तीच उपाययोजना करणे त्यांनी सुरू करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट सरकार सांगेल म्हणून कोणी वाट पाहण्याची गरज नाही. कोविडचा प्रसार वाढत आहे हे दिसून येत आहे. यामुळे जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, एकमेकांपासून सुरक्षित शारीरिक अंतर सार्वजनिक ठिकाणी बाळगणे, गर्दीत जाणे टाळणे, आदी सूचना पुन्हा करण्याची गरज नाही.

राज्यातील जनतेने कोविड महामारी अनुभवलेली आहे, यामुळे कोविड पासून बचावासाठी काय काय उपाययोजना करावी लागते याची त्यांना पूर्ण माहिती आहे. यामुळे जनतेने स्वयंप्रेरणेने उपाययोजना करणे सुरू करावे.

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत काही बदल करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीला आपण उपस्थित होतो, असे सांगून ते म्हणाले, या योजनेत नेमके काय बदल केले जातील याची माहिती मुख्यमंत्री नंतर देतील याविषयीची प्राथमिक तयारी विविध पातळीवर सुरू आहे.

त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे. आरोग्य विमा कवच रकमेत वाढ केली जाणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

दिवसभरात १२ नवे रूग्ण

राज्यात दिवसभरात कोविड चे १२ नवे रुग्ण सापडले. २४ तासात १६ रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. सध्या राज्यात ५९ सक्रिय रुग्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com