COVID-19 GOA: गेल्या पंधरा दिवसांपासून महिला डॉक्टरांची मृत्यूशी झुंज

COVID-19 GOA Death of a female doctor in the battle of Corona
COVID-19 GOA Death of a female doctor in the battle of Corona
Published on: 
Updated on: 

म्हापसा: कोविडच्या लढाईत(COVID-19 GOA Death) डॉक्टर,(Doctor) परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण सहन करून रुग्णांची सेवा करताना कोविडची लागण होत आहे. म्हापसा(Mapusa) येथील डॉ. अनारकली जयवंत परब(Anarkali Jaywant Parab) या युवा महिला डॉक्टरचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे काल मृत्यू झाला. म्हापशातील एका खासगी इस्पितळात गेल्या पंधरा दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या.(COVID-19 GOA Death of a female doctor in the battle of Corona)

कोरोनाच्या फैलावामुळे राज्यातील इस्पितळे रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांची अखंडपणे सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका यांचे जीव धोक्यात आले आहेत. डॉ. अनारकली परब या युवा डॉक्टर कोविड वॉर्डमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत होत्या. या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. या संसर्गाच्या चक्रव्यूहातून त्या सुरक्षित बाहेर पडतील, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत होते, पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.

पंधरा दिवसांपासून त्यांना म्हापशातील खासगी इस्पितळात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी 11च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता म्हापशात समजताच सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले जात आहे. या घटनेने डॉ. अनारकली परब यांचे कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत. डॉ. परब यांच्या निधनामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
goa burglaries festive season crime news
bicholim marigold flower cultivation
honda gram sabha mining opposition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com