Goa News: अफरातफरप्रकरणी ब्लासिओ मिनेझिसचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मोरंबी ओ ग्रँडे टेनंट असोसिशनमधील अफरातफरप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी असोसिशनच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Extortion Case
Extortion CaseDainik Gomantak

Goa News: मोरंबी ओ ग्रँडे टेनंट असोसिशनमधील अफरातफरप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी असोसिशनच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या समितीचे माजी सचिव ब्लासिओ मिनेझिस (७५ वर्षे) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

Extortion Case
Ayushman Bhav: ‘आयुष्मान भव’ उपक्रमाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

पोलिसांनी सादर केलेल्या माहितीनुसार अर्जदाराविरुद्धचे आरोप खोटे असू शकत नाही. लेखा परीक्षणातून असोसिशनच्या निधीची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले आहे,असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

असोसिएशनच्या निधीच्या अफरातफरीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीचा जुने गोवे पोलिस तपास करत आहेत. या तपासकामाच्या चौकशीसाठी अर्जदार ब्लासिओ मिनेझिस याला चौकशीसाठी २९ ऑगस्ट रोजी बोलावले होते. त्यावेळी तो उपस्थित राहिला.

Extortion Case
E Marketing: गणेशचतुर्थीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-मार्केटची सुरवात

पोलिस पुन्हा चौकशीस बोलावून अटक करतील किंवा मारहाण करतील या भीतीने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो वृद्ध असून पोलिस बोलावतील तेव्हा उपस्थित राहण्यास तयार आहे, मात्र जर अटक केली तर पोलिसांना जामिनावर सुटका करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

जुने गोवे पोलिसांनी त्याला विरोध करून नमूद केले,की या समितीचा तीन वर्षांचा कार्यकाळ ३१ मे २०१९ रोजी संपला तरी अर्जदाराने आणखी तीन वर्षे सचिव पदावर होता. या असोसिएशनने व्होडली मानस व झोड्डी मानसचा लिलाव केला होता.

सर्वाधिक बोलीधारकाला एका वर्षासाठी मासे व्यवसायासाठी देण्यात येते. या लिलावातून येणारी रक्कम मानसच्या स्ल्युईस गेट व बांधाच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येते.

या लिलावाची रक्कम मिळाल्यावर ती असोसिएशनच्या खात्यात जमा केली नाही हे लेखा परीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी अर्जदाराला अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, अशी बाजू मांडली होती ती न्यायालयाने उचलून धरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com