कळंगुट रेस्टॉरंट तोडफोडीतील संशयितांना न्यायालयीन कोठडी

या प्रकरणातील आणखी संशयितांना अटक करणे बाकी असून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली
Calangute Souza Lobo Restaurant Case
Calangute Souza Lobo Restaurant CaseDainik Gomantak

पणजी: कळंगुट येथील सौझा लोबो यांच्या रेस्टॉरंटच्या तोडफोडप्रकरणी क्राईम ब्रँचच्या विभागाने 15 जणांना अटक केली होती. या सर्व संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी संशयितांना अटक करणे बाकी असून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (court custody for calangute Souza Lobo Restaurant vandalism suspects)

Calangute Souza Lobo Restaurant Case
.. 'म्हणून' बांबोळीतील गाडेधारकांनी घेतला निर्णय

गेल्यावर्षी 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा सुमारे 80 जणांच्या बाऊन्सर्सनी हँगओव्हर तथा सौझा लोबो (Souza Lobo Restaurant) यांच्या रेस्टॉरंटवर हल्ला केला होता. या हल्ल्यात रेस्टॉरंटची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले होते. कळंगुट पोलिसांनी कारवाईत केलेल्या हयगयमुळे हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे (Crime Branch) सुपूर्द करण्यात आले होते.

Calangute Souza Lobo Restaurant Case
संदीप निगळ्‍ये अपक्ष निवडणूक लढवणार

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजेंद्र सिंग याच्यासह पंधराजणाना अटक झाली आहे. त्यातील काही संशयितांना नाशिक येथे ताब्यात घेऊन गोव्यात (Goa) आणण्यात आले आहे. पोलिस तपासकामासाठी म्हापसा (Mapusa) न्यायालयाने संशयितांना 10 दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. ही कोठडी संपल्यानंतर त्यात वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक राहुल परब हे करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com