Goa Police: व्‍यसनाधीन पोलिसांना कौन्‍सिलिंग, मेडिटेशन; वरिष्‍ठ पातळीवरून आदेश निघणार

Goa Police Department: गंभीर स्थितीची दखल, मद्य, ड्रग्स घेणाऱ्या, जुगारी पोलिसांवर राहणार वाॅच
Goa Police Department: गंभीर स्थितीची दखल, मद्य, ड्रग्स घेणाऱ्या, जुगारी पोलिसांवर राहणार वाॅच
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पोलिस व्‍यसनाधीनतेपासून दूर राहावेत, या उद्देशाने खात्‍यांतर्गत व्‍यापक समुपदेशन मोहीम राबवण्‍यात येणार आहे. त्‍याला मेडिटेशनचीही (ध्‍यानधारणा) जोड देण्‍यात येणार आहे. परिणामी कार्यशक्‍ती वाढून शारीरिक, मानसिक तसेच कौटुंबिक पातळीवर सकारात्‍मक परिणाम दिसून येतील. ठोस नियोजनाअंती वरिष्‍ठ पातळीवरून तसा आदेश काढण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस दलातील व्‍यसनाधीनता, हा सध्‍या कळीचा मुद्दा बनला आहे. त्‍यावर मार्ग काढण्‍यासाठी दूरदृष्‍टीने विचार करण्‍यात येत आहे. काही पोलिस कर्मचारी मद्य, ड्रग्स तसेच जुगाराच्या आहारी गेल्याने पोलिस खात्याने कडक कारवाई करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्‍यात आला.

परंतु अशा कर्मचाऱ्यांना सुधारण्‍यासाठी मानसिक पातळीवर कायमस्‍वरूपी बदल घडावेत, यासाठी दलातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी विचार सुरू केला. त्‍याद्वारे समुपदेशन व मेडिटेशनवर भर देण्‍याचे ठरले आहे. अर्थात असा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. मात्र, त्‍यात सातत्‍य व विशेष मेहनत पुढील काळात दिसून येईल, अशी माहिती वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. त्यात काहीजण कामावर असतानाही अशा गोष्टी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळेच पोलिस अधीक्षकांनी हा आदेश जारी केला आहे.

काही पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना दारू पिऊन न येण्याचे संकेत देऊनही काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जे कर्मचारी दारू, ड्रग्स तसेच जुगार खेळताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Goa Police Department: गंभीर स्थितीची दखल, मद्य, ड्रग्स घेणाऱ्या, जुगारी पोलिसांवर राहणार वाॅच
Goa Police: तब्बल ६०० जणांविरुद्ध कारवाई; उत्तर गोवा पोलिसांची धडक मोहीम

बराकीत चालतोय जुगाराचा अड्डा!

१. पोलिस स्थानक तसेच विश्रामगृहात काही पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर ओल्या पार्ट्या करतात. प्रत्येक स्थानकात पोलिसांना ड्युटी संपल्यावर आराम करण्यासाठी बराकींची सोय केली आहे. मात्र, त्याचा गैरवापर केला जात आहे.

२. या ठिकाणी पोलिस कर्मचारी पत्त्यांचा जुगार खेळतात. काहीवेळा वाढदिवसाच्या ओल्या पार्ट्याही झोडल्या जातात, याची माहिती वरिष्ठ पोलिसांपर्यंत पोचली होती. कामावर परिणाम होण्याबरोबरच खात्याचेही नाव बदनाम होत असल्याने हे ठोस पाऊल उचलले आहे.

Goa Police Department: गंभीर स्थितीची दखल, मद्य, ड्रग्स घेणाऱ्या, जुगारी पोलिसांवर राहणार वाॅच
Goa Police: पोलिसांची नशा उतरवणार! नव्या DGP च्या आदेशाने धाबे दणाणले

अशी झाली पोलखोल

कामावर असताना दारू, ड्रग्सचे सेवन करणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार करून ती अधीक्षकांना देण्याचे निर्देश पोलिस स्थानक प्रमुखांनाच दिले आहेत. त्यासंदर्भातील आदेश पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी आदेश जारी केला.

या आदेशानंतर कर्मचाऱ्यांमध्‍ये खळबळ उडाली. पोलिस खात्यातील अनेक कर्मचारी दारू, ड्रग्स, तसेच जुगाराच्या आहारी गेले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासह त्यांच्या कामावरही होत आहे.

ड्युटीवर कर्मचाऱ्याने कोणतेही व्यसन करण्यास मनाई आहे. मात्र, पोलिस खात्यातील अनेक कर्मचारी कामावर असतानाही दारू, ड्रग्स, जुगाराच्या आहारी गेले असल्‍याचे बोलले जात आहे.

उत्तर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी पोलिस स्थानके आणि युनिट्सना महिन्यातून किमान एकदा भेट द्यावी व कामावर असताना दारू, ड्रग्सचे सेवन केलेले, तसेच जुगार खेळणारे पोलिस कर्मचारी सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असेही आल्बुकर्क यांनी आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com