Cooch Behar Trophy: मोठ्या आघाडीमुळे त्रिपुरा सुस्थितीत; गोव्यासाठी सामन्याच्या अखेरचा दिवस निर्णायक

गोव्याला किती धावांचे आव्हान मिळते यावर सामन्याचा निकाल अवलंबून
Cooch Behar Trophy:
Cooch Behar Trophy:Dainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy 2023: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात अडीचशे धावांची आघाडी मिळाल्यामुळे त्रिपुराचा संघ सुस्थितीत आहे, तर सामन्याचा शेवटचा दिवस गोव्याच्या फलंदाजांसाठी निर्णायक असेल.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात त्रिपुराने तिसऱ्या दिवसअखेर रविवारी 7 बाद 287 धावा केल्या. पहिल्या डावातील 35 धावांच्या पिछाडीमुळे त्यांच्यापाशी आता एकूण 252 धावांची आघाडी आहे.

Cooch Behar Trophy:
Vijay Merchant Trophy: गोव्याची मुले सौराष्ट्रवर भारी; 73 धावांनी विजय, द्विज पालयेकरचे 5 बळी

त्रिपुरा संघ सोमवारी अखेरच्या चौथ्या दुसऱ्या डावात किती धावा करतो आणि गोव्याला किती धावांचे आव्हान मिळते यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

त्रिपुराच्या दुसऱ्या डावात कर्णधार दीपजॉय देब (41) व देबांग्शू दत्ता (64) यांनी 84 धावांची सलामी दिली. नंतर प्रीतम दास (60) व सप्तजित दास (नाबाद 82) यांच्या अर्धशतकांमुळे पाहुण्या संघाच्या डावाला बळकटी प्राप्त झाली.

गोव्यातर्फे फिरकी गोलंदाज शिवांक देसाई सफल ठरला. त्याने तीन गडी टिपले.

Cooch Behar Trophy:
Vijay Hazare Trophy 2023: गोव्याचे उडणारे विमान जमिनीवर; बंगालचा आठ विकेटने दणदणीत विजय

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव ः सर्वबाद 180

गोवा, पहिला डाव ः सर्वबाद 215

त्रिपुरा, दुसरा डाव (बिनबाद 42 वरुन) ः 96 षटकांत 7 बाद 287 (दीपजॉय देब 41, देबांग्शू दत्ता 64, प्रीतम दास 60, सप्तजित दास नाबाद 82, पुंडलिक नाईक 19-2-62-2, युवराज सिंग 23-2-94-1, कौस्तुभ पिंगुळकर 11-2-37-0, शिवांक देसाई 15-5-27-3, यश कसवणकर 24-9-41-0, शंतनू नेवगी 4-0-15-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com