Valpoi News : पंचायत इमारतीमुळे लोकांची सोय : दिव्या राणे

Valpoi News : पर्ये मतदारसंघात प्रचार; केंद्राकडून मोठे सहकार्य
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, विकसित संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोचविण्याचे आमचे प्रयत्न होते.

महिलांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे आज हे सर्व प्रकल्प अस्तित्वात येत आहेत. म्हाऊसमध्ये अत्याधुनिक पंचायत इमारत उभारून लोकांना चांगली सोय करून दिली, अशी माहिती आमदार दिव्या राणे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी पर्ये मतदारसंघात आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये कोपरा बैठका, सभा तसेच घरोघरी प्रचार सुरू आहे. प्रचार फेरीचा हा दुसरा टप्पा आहे. वाळपईतील त्यांच्या कार्यालयात दरदिवशी प्रत्येक पंचायत क्षेत्रातील लोकांची बैठक होते.

बऱ्याचदा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेही त्यांच्यासोबत प्रचार करतात. केरीपासून पर्ये, मोर्ले, भिरोंडा, ठाणे, म्हाऊस, होंडा आदी पंचायत क्षेत्रांत टप्प्याटप्प्याने प्रचार केला जात आहे. दररोज बैठका, कोपरा बैठकांवर भर दिला जात आहे. यावेळी केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंच राधिकी सावंत, सुलभा देसाई, प्रीती गावकर, कांता गावस, गुरुदास गावस, सयाजी सावंत आणि मान्यवर

उपस्थित होते. यावेळी म्हाऊस, दाबे, झर्मे गावांत कोपरा बैठका घेण्यात आला. यावेळी लोकांनी आमदारांशी संवाद साधून आपल्या समस्या कथन केल्या. आमदारांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

Valpoi
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाला आणि यापुढे त्यांच्यामुळेच होणार आहे. सत्तरीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आम्ही वावरत आहोत. लोकांचे राहणीमान बदलताना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा विकासाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूंपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये मतदारसंघ.

विकासाच्या मुद्यांवर भर

गेल्या दोन वर्षांत पर्ये मतदारसंघाचा झापाट्याने विकास झाला आहे. त्यात रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण, केरी, मोर्ले, पर्ये, भिरोंडा आदी पंचायत क्षेत्रांत नवीन पाणी प्रकल्प, भूमिगत वीजवाहिन्या, मोबाईल टाॅवर, तसेच मोठमोठे प्रकल्प अस्तित्वात आले आहेत. काही पंचायतींच्या नवीन इमारती उभारल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com