मडगाव : पावसाळा पूर्व कामाचे नियोजन करण्यासाठी आणि हे काम कंत्राटदाराला देण्यासाठी निविदा काढण्याच्या मंजुरीसाठी मडगाव नगरपालिकेच्या खास कौन्सिल बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. मजूरांच्या उपलब्धतेवरुन नगरसेवकांनी हा गदारोळ केला. दररोजच्या कामासाठी प्रभागांमध्ये मजूर वेळेवर येत नाहीत. काम करत नाहीत यावरुन नगरसेवकांनी नगराध्यक्षांना लक्ष्य करुन प्रश्नांची सरबत्ती केली. (Controversy in Madgaon Municipality over availability of labor News Updates)
एप्रिल संपल्यातच जमा आहे. आता पावसाळा पूर्व कामासाठी निविदा काढण्यास नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून मान्यता मिळवावी लागेल. नंतर निविदा जाहीर करणे आणि कंत्राटदाराची निवड करणे या सर्व प्रक्रियेस बराच वेळ लागेल. पावसाळा पूर्व काम पावसाळा सुरु झाल्यावर सुरु करणार का असा सवाल नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी नगराध्यक्षांना केला.
त्यावर उत्तर देताना मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागांमध्ये तीन दिवसांसाठी 75 मजूर देण्यात येईल. तसेच प्रत्येक प्रभागात आळीपाळीने पावसाळा पूर्व कामे हातात घेतली जातील. यासाठी नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे 15 लाख आणि नगरपालिका फंडातून 6 लाख असे एकूण 21 लाख रुपये खर्च करणार आहे. आपण उद्या ठरावाची प्रत घेऊन नगरपालिका प्रशासन संचालनालयात जाऊन निविदेसाठी मंजुरीचे काम तातडीने करुन घेणार असल्याचं नगराध्यक्षांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी पुढे सांगितले की, या कामासाठी दोन कंत्राटदारांची निवड केली जाईल. फातोर्डा आणि मडगाव प्रभागातील कामे त्यांना वाटून दिली जातील. शिवाय कामासाठी येण्यापूर्वी कंत्राटदार आणि त्या त्या प्रभागातील नगरसेवक यांच्या समन्वयानेच ही कामे पूर्ण केली जातील असेही नगराध्यक्षांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.