
Consumer Complaints South Goa District Forum State Commission Hearing
मडगाव: दक्षिण गाेवा ग्राहक तक्रार निवारण जिल्हा आयोगाच्या एकूणच कारभाराविषयी तीन ग्राहकांनी नागरी पुरवठा खात्याकडे केलेल्या तक्रारी सध्या राज्य आयोगासमोर सुपुर्द करण्यात आल्या असून राज्य आयोगाने या तिन्ही ग्राहकांची बाजू 9 एप्रिल रोजी ऐकून घेतली. आता या प्रकरणात दक्षिण गोवा आयोगाच्या अध्यक्षांना नोटीस देण्यात आली असून पुढच्या आठवड्यात त्यांचीही सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा आयोगाच्या विरोधात जोजेफ वाझ, प्रियांका तळावलीकर आणि विजय कपूर या तीन ग्राहकांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे तक्रार दिली होती. दक्षिण गोवा जिल्हा आयाेगाकडून ग्राहकांना (Customers) तक्रारी दाखल करण्यासाठी पोषक असे वातावरण नाही आणि या आयोगाकडे तक्रार दाखल केल्यास ती आयाेगासमाेर मांडण्यासाठी ग्राहकाने वकिलांची नेमणूक करावी यासाठी दबाव आणला जातो, असे म्हटले होते.
या तक्रारीची नागरी पुरवठा खात्याने प्राथमिक चाैकशी केल्यानंतर हे प्रकरण राज्य आयाेगासमोर दाखल केले होते. त्यानुसार राज्य आयाेगाने तिन्ही ग्राहकांना नोटीस पाठवून त्यांना आयोगासमोर बोलावून 9 एप्रिल रोजी त्यांची बाजू ऐकून घेतली होती. दक्षिण गोवा (South Goa) ग्राहक आयोगाचा हा मुद्दा विधानसभेतही चर्चेत आला हाेता. यावेळी विजय सरदेसाई यांनी या जिल्हा आयाेगाचे काम योग्यरितीने हाताळले जात नाही, अशी टीका केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.