Canacona : समाजातील अंतिम घटकाचा विकास हेच ध्‍येय : सभापती तवडकर

काणकोणातील गरीब, गरजू, निराधार लोकांना आसरा
Canacona
Canacona Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona : समाजातील एकदम शेवटच्‍या नागरिकाचा उद्धार करणे हे भाजपचे तत्त्‍व आहे. याच मुशीतून कार्यकर्ते तयार झाल्याने अंत्योदय तत्वावरच गरिबांच्या डोक्यावर छप्पर निर्माण करून देण्याची श्रम-धाम संकल्पना आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

श्रम-धाम योजनेअंतर्गत गरिबांसाठी घरकुल उभारणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते काणकोण येथे पायाभरणी सोहळा झाला. त्‍यावेळी तवडकर बोलत होते.

Canacona
यापूर्वीही न्यायालयाने फिरविले आहेत सभापतींचे काही निर्णय

ज्या कुटुंबांना शासकीय योजनेचा मागमूस नाही, अशा कुटुंबांना लोकसहभागातून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येत्या चार वर्षांत काणकोण मतदारसंघात एकही माणूस छपराविना असणार नाही. हीच तळमळ घेऊन बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनची निर्मिती करण्‍यात आली आहे.

ज्या पालकांना आपल्या पाल्यांची फी देणे शक्य नसल्याने शिक्षण देता येत नाही, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न फाऊंडेशनचा आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय साहाय्य देण्‍याचेही ध्येय असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

सभापती तवडकर यांनी श्रमदान करून घर उभारणीचा आदर्श राज्यापुढे ठेवला आहे असे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. तर, प्रत्येक आईला व बापाचे आपल्या मुलांसाठी घरकुल असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न साकार करण्याची संकल्पना सभापती तवडकर यांच्या डोक्यात आली. त्यासाठी त्‍यांना सलाम करायला हवा, असे भाजप प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, मिरज येथील बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक काळे यांनी एक घर बांधून देण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे मिरज येथील दुसऱ्या वर्गमित्रानेही आणखी एका घरासाठी निधी देण्याचे जाहीर केले.

Canacona
Canacona : गरिबांना घर उभारणीसाठी सर्वतोपरी मदत, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

लोकसहभागातून घरांची उभारणी

ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, घरातील मुख्‍य आधार गेला आहे, कुणाचे सर्वच कुटुंब अपंगत्वाने ग्रासले आहे, अशा रहिवाशांना घरे उभारून देण्याचा प्रयत्न तवडकर यांनी चालविला आहे. या प्रयत्नातून त्यांनी 33 दिवसांच्या अल्पकालावधीत खोतीगाव व गावडोंगरी पंचायत क्षेत्रात प्रत्येकी एक घर उभारले आहे.

आता त्यांनी बलराम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून मे महिन्यापर्यंत प्रथम 14 व नंतर 100 घरे उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक रूपया व एक दिवस श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्येक घरासाठी 8 ते 10 लाख रूपये खर्च येणार आहे. गावकीची भावना पुन्हा रूजविण्याचा प्रयत्न असल्याचे तवडकर म्‍हणाले.

परप्रांतीय स्थिरावले पण..

गोवा मुक्तीनंतर अन्य राज्यांतून गोव्यात जे आले, ते येथे स्थिरस्थावर झाले. त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र, गावातील लोक आहे त्याच स्थितीत आहेत. याची जाणीव झाल्यानेच ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना चालीस लावली.

सरकारच्या कल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी गरजूंपर्यंत पोहोचवण्याची गरज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com