Ponda: तर सरकार कसं बनविणार? कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर

काँग्रेसमध्ये पाचच आमदार शिल्लक राहिले असताना आमदारांना श्रेष्ठी सांभाळू शकत नसतील, तर भविष्यात सरकार कसे काय बनविणार?
कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर
कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्‍हाट्यावरDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्याचे (Ponda) काँग्रेसचे (Goa Congress) आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांना विश्वासात न घेता फोंडा गट काँग्रेस समिती बरखास्त केल्यामुळे फोंड्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यातून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये आता फक्त पाचच आमदार शिल्लक राहिले असताना सुद्धा या आमदारांना श्रेष्ठी सांभाळू शकत नसतील, तर भविष्यात सरकार कसे काय बनविणार? हा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे. (Congress workers are upset over dismissal of ponda group Congress committee)

फोंडा मतदारसंघ अजूनही काँग्रेसच्या अधिपत्याखाली असूनसुद्धा त्या मतदारसंघातील काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आमदारांना व गटसमितीला विश्वासात न घेता मतदारसंघातील निर्णय बाहेरच्या बाहेर घेतले जात असल्याचे सांगितले जाते. विद्यमान समितीची मुदत 2023 साली संपणार होती. पण, तत्पूर्वीच कोणतेही कारण न देता ही समिती बरखास्त केली आहे. पूर्वीच्या गटसमितीने कुर्टी खांडेपारचे माजी सरपंच जॉन परेरा यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केल्यामुळे ही कारवाई केली गेली असावी, असा तर्क व्यक्त होत आहे. काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले राजेश वेरेकर यांना उमेदवारी देण्यासाठी हे व्यासपीठ तयार केले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर
Goa : कांदोळीत बांधकामांवर हातोडा!

शिरोडा, मडकई, प्रियोळ या फोंडा तालुक्यातील मतदारसंघातील गटसमित्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी परिस्थिती असताना सक्रिय असलेली फोंडा गट समिती बरखास्‍त का केली, असा प्रश्न उपस्‍थित केला जात आहे. यातून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अंतर्गत दुफळीला वाव दिल्याचे अनेक कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत. राजेश वेरेकर यांना फोंड्यातील काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात. परंतु, आमदार रवी नाईक यांची भूमिका अजूनही अस्पष्ट असल्यामुळे, तसेच रवी नाईक काँग्रेसचे आमदार असल्यामुळे कामत व चोडणकर असे परस्पर निर्णय घेऊ शकतात की काय? यावरही प्रश्न उपस्थित केले जात

आहेत. या होऊ घातेलल्या अंतर्गत दुहीमुळे फोंड्यातील काँग्रेसच्या कार्याची धार बोथट व्हायला लागल्यासारखी झाली आहे. अशी कारवाई करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेमके काय साधू पाहतात, याचे उत्तर आता प्रदेशाध्यक्षांबरोबर काँग्रेसच्या श्रेष्ठींनींही द्यायला हवे एवढे मात्र खरे.

...ही तर हुकुमशाहीच : रवी नाईक

फोंडा गट समिती कोणतेही कारण न देता बरखास्त करून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपली हुकुमशाही वृत्तीच प्रत्ययाला आणली, असे फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी ‘दै. गोमन्तक’शी बोलताना सांगितले. आपल्या मतदारसंघातील गटसमित्या बरखास्त करणे हे चोडणकरांच्या मनमानी वृत्तीचे द्योतक आहे. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत याच नाण्याची दुसरी बाजू आहे. न्यायालयाने आरोप निश्चित केल्यामुळे दिगंबर कामत यांनी राजीनामा द्यावा या नार्वेकर यांनी केलेल्या मागणीबद्दल रवी नाईक यांना विचारल्यावर दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री असताना जर क्रिकेट घोटाळा प्रकरणावरून नार्वेकरांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला असेल, तर आरोप निश्चित केल्यामुळे तोच निकष कामत यांना लागायला हवा.

कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर
Goa: आम्हाला बेकायदा ठेवू नका, घरपट्टी लागू करा

कारण समजेना : गुडेकर

कोणतेही कारण न देता आमची समिती बरखास्त केल्याचे या गट समितीचे मावळते अध्यक्ष अरुण गुडेकर यांनी सांगितले. समिती बरखास्त केल्याबद्दल आपल्याला एक संदेश आला. पण, त्यात कोणतेही कारण नमूद केले नव्हते, असे ते म्हणाले. गटसमिती ही कार्यकर्त्यांनी निवडून दिल्यामुळे तसेच कार्यकाळ अजूनही संपायचा असल्यामुळे अशी कारवाई का केली? याचे आकलन होत नाही. वास्तविक राज्यात फोंडा गट समिती मडगावनंतर दुसऱ्या क्रमांकावर येते, मडकई, प्रियोळ, शिरोडा येथे कोणच लक्ष देत नसल्याचे श्री. गुडेकर यांनी सांगितले.

ही दुर्देवी घटना : परेरा

फोंडा गट समिती बरखास्त केल्याबद्दल खरोखर धक्का बसला, असे काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्ह्याचे सचिव जॉन परेरा यांनी सांगितले. चांगले कार्य करीत असलेल्या समितीला, अचानक कारण न सांगता बडतर्फ करण्यासारखी कोणती घटना घडली, याचा उलगडा होत नाही असे ते म्हणाले.

-मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com