Goa Political News : ताळगावात काँग्रेसमध्‍ये मरगळ; भाजप भक्कम

भाजपचे कार्य तळागाळात; आम आदमी पक्षही चर्चेत
Jennifer Monserrate and Babush Monserrate
Jennifer Monserrate and Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीवेळी ताळगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाने भाजपसमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. या ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यताही वर्तविली जात होती, परंतु या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा आजही करिश्‍मा कायम असल्याचे दिसून आले आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात पुन्हा एकदा आमदार झाल्या. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर येथील काँग्रेसमध्ये पूर्णतः मरगळ आल्याचेच चित्र दिसू लागले आहे.

Jennifer Monserrate and Babush Monserrate
Amarnath Panjikar : काँग्रेसच्या विरोधाचा आरोप सिद्ध करून दाखवा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बाबूश मोन्सेरात यांचे समर्थक समजले जाणारे टोनी रॉड्रिग्ज, उदय मडकईकर, दया कारापूरकर ही मंडळी फुटली आणि काँग्रेसच्या तंबूत गेली. ताळगावात काँग्रेसच्या विचारांची मते असल्याने तत्कालीन परिस्थिती पाहता काँग्रेसला यश मिळेल असे वाटत होते, परंतु जेनिफर मोन्सेरात यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्याने त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले.

आमदार बाबूश मोन्सेरात यांचा या मतदारसंघात दबदबा आहे. त्याचाही त्यांना फायदा झाला, शिवाय जेनिफर मोन्सेरात यांना प्रचारासाठी घरोघरी जावे लागले होते. काँग्रेसने त्यावेळी चांगली हवाही निर्माण केली होती. विधानसभेसाठी काँग्रेसने टोनी रॉड्रिग्ज यांना उमेदवारी दिली. टोनी यांनी प्रचारही जोरदार केला, परंतु त्यांना तो यशापर्यंत नेऊ शकला नाही.

या दरम्यान या मतदारसंघात आप, रिव्होल्युशनरी गोवन्स आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने उमेदवार दिले होते. त्यातल्या त्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवार सेसिल रॉड्रिग्ज या फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत, परंतु त्यानंतर त्यांनी या मतदारसंघातील विषय घेऊन सतत आवाज उठविण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

त्यामुळे मतदारसंघात आपची चर्चा तरी होत आहे. परंतु काँग्रेस कोठेच दिसत नसल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील अनेक विषय असतानाही काँग्रेस शांत आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर विविध विषय घेऊन येण्याऐवजी स्थानिक विषय सतत उपस्थित करण्याचे काम येथील काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसत नाहीत.

पदाधिकारी विचार कधी करणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी साथ सोडलेले मडकईकर आणि कारापूरकर हे दोघेही पुन्हा बाबूश गटात सहभागी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. टोनी रॉड्रिग्ज यांच्या प्रचाराची धुरा जवळपास मडकईकर यांनी सांभाळली होती.

त्यामुळे त्यांना अपेक्षित मते पडली. आता मडकईकर काँग्रेस सोडून पुन्हा बाबूश गोटात सहभागी झाले, तर टोनी हे एकाकी पडतील. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची बांधणी करण्यापेक्षा आत्तापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागल्यास पुढे त्याचा निश्‍चित उपयोग होऊ शकतो, याचा विचार पक्षाचे पदाधिकारी करणार आहेत की नाही?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com