कॉँग्रेसच्या मोर्चाला पांगवतान गोवा पोलिस (Congress Protest Goa)
कॉँग्रेसच्या मोर्चाला पांगवतान गोवा पोलिस (Congress Protest Goa)Dainik Gomantak

Congress Protest: आझाद मैदानाबाहेर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

मुख्यमंत्र्यांच्या निवासाकडे कूच करताना उडाली धुमश्‍‍चक्री (Congress Protest At Goa)
Published on

पणजी (प्रतिनिधी) : येथील आझाद मैदानावर (Azad Maidan) महागाई व बेरोजगारी विरोधात शांततापूर्ण धरणे आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या (Goa CM Residence) निवासस्थानी मोर्चा (Congress Protest Goa) नेण्यासाठी आझाद मैदानाच्या बाहेर जमलेल्या युवा कॉंग्रेसच्या (Youth Congress Goa) नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देऊन रोखले. मात्र, खवळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या धुमश्‍‍चक्रीत पोलिसांनी (Goa Police) लाठीमार केला. यात कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या घटनेचा प्रदेश कॉंग्रेसने (Goa Pradesh Congress) तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

कॉँग्रेसच्या मोर्चाला पांगवतान गोवा पोलिस (Congress Protest Goa)
Goa: चतुर्थी साजरी करताना काळजी घ्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हा लोकशाहीवर हल्ला झाल्याचे म्हटले असून, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लाठीमारीची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राष्ट्रीय सचिव कृष्णा अलावरु यांनीही या घटनेचा निषेध केला. यावेळी अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, युवा कॉंग्रेसचे गोवा प्रभारी अखिलेश यादव, गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर व इतर नेते उपस्थित होते.

त्यापूर्वी आझाद मैदनावरील धरणे आंदोलनात बोलताना कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्षभरात राज्यात सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांनी भाजपच्या नोकरी देण्याच्या आमिषांना बळी न पडता कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे उभे राहावे व येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी केले.

कॉँग्रेसच्या मोर्चाला पांगवतान गोवा पोलिस (Congress Protest Goa)
Goa जैन समाजाचा सर्वात पवित्र सण 'पर्युषण पर्वाचा' आज पाचवा दिवस

राष्ट्रीय अध्यक्षांनाही पोलिसांचा मार

धरणे आंदोलनानंतर सर्वजन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कूच करण्यासाठी मैदानाच्या बाहेर येऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी मोर्चाची परवानगी नसल्याचे सांगितले. तसेच राज्यात कर्फ्यू असल्याचे सांगितले. मात्र, कॉंग्रेसच्या नेत्यांनी पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. काही जनांना अटकही केली. यावेळी युवा कॉंग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनाही पोलिसांच्या लाठीचा मार खावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com