Canacona News : लोलयेतील सुतारकाम केंद्रात बेकायदा लाकूड चिरकाम?

चौकशीची मागणी : लाकडाचा पास नसल्याची कबुली
Congress leader Janardhan Bhandari & GPF leader Vikas Bhagat
Congress leader Janardhan Bhandari & GPF leader Vikas Bhagat Dainik Gomantak
Published on
Updated on

लोलये पंचायत क्षेत्रातील तामने येथील शासकीय सुतारकाम केंद्रात बेकायदा पाच ट्रक लाकूड चिरण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी केली आहे.

यावेळी सुतारकाम केंद्राच्या प्रमुखांनी स्पष्टपणे या लाकडाचा पास नसल्याची कबुली दिली आहे. फक्त उच्च लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन हे लाकूड चिरण्यात आले आहे. यासंदर्भात वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही आपले हात वर केले आहेत.

हे लाकूड गरिबांच्या घरांसाठी नसून एका खासगी बंगल्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी यांनी केला आहे. हे बेकायदा चिरलेले लाकूड व चिरण्याचे बाकी असलेले लाकूड ताबडतोब वन खात्याने जप्त करण्याची मागणी गोवा फॉर्वरडचे विकास भगत यांनी केली आहे.

Congress leader Janardhan Bhandari & GPF leader Vikas Bhagat
Goa Mining : खाणी परत सुरू करताना गावातील जलसाठ्यांची निगा राखावीच लागेल

वनमंत्र्यांनी लक्ष घालावे

या इमारती लाकडामध्ये सागवान, माडत व नाणो या बहुमूल्य इमारती लाकडाचा समावेश असून जंगलात या वृक्षाची बेकायदा कत्तल करण्यात आली आहे, असा आरोप भगत यांनी केला आहे. हे लाकूड कोठून आणले, कोणी आणले व त्याची वाहतूक कोणत्या शासनाद्वारे केली याची चौकशी वनमंत्र्यांनी करण्याची मागणी भगत यांनी केली आहे.

अन्य लाकूड बेकायदा

या संदर्भात वन खात्याशी संपर्क साधला असता, लोलये शासकीय सुतारकाम केंद्रावर ९.९४ घनमीटर लाकूड विनापासचे आहे. मात्र, सागवानी ओंडक्यावर हेमरिंग केलेले असून ते पासचे लाकूड आहे. परंतु किंदळ, माडत व अन्य जातीचे लाकूड बेकायदा असल्याचे वन खात्याच्या अधिकऱ्यांनी स्पष्ट केले.

Congress leader Janardhan Bhandari & GPF leader Vikas Bhagat
Mann Ki Baat@100 : 100व्‍या ‘मन की बात’चे राज्यभर प्रक्षेपण : सदानंद शेट तानावडे

भंडारी व भगत यांचे आरोप दिशाभूल करणारे : सभापती

वन खात्याचे लाकूड लिलाव पद्धतीने आहे त्याच जागेवरून विकत घेण्यात आले आहे. ते लाकूड श्रमधाम घरांसाठी वापरण्यात येणार असून ते चिरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. मात्र, कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे विकास भगत दिशाभूल करीत असल्याचा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केला आहे.

या लाकडांसंदर्भात वन खात्यात पैसे भरणा केले असून त्याची पोचपावती असल्याचे तवडकर यांनी सांगितले. मात्र, हे नेते सुतारकाम केंद्रातील लाकडांच्या वेगळ्याच ओंडक्यांचे ढीग व्हिडिओवर दाखवून दिशाभूल करत आहेत. यासंदर्भात अब्रुनुकसानीचा खटला दोघांविरुद्ध दाखल करण्यात येणार असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com