गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे

स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस सरकारने गोवा मनोरंजन सोसायटीच्या माध्यमातून ‘फिल्म फायनान्स’ योजना सुरू केली होती.
गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे
गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोव्यातील चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या विशेष विभागाची मागणी काँग्रेस लावून धरते आणि त्यानंतरच भाजप सरकारला या विषयाबद्दल जाग येते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2020 सालच्या इफ्फीनंतर गोव्यामध्ये निर्माण झालेल्या स्थानिक सिनेमांबद्दल गोवा मनोरंजन सोसायटीच्या प्रमुखांनाच माहिती नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. ही बाब तर अत्यंत धक्कादायक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयामध्ये हस्तक्षेप करावा आणि 2021 च्या इफ्फीमध्ये गोमंतकीय सिनेमांच्या विशेष विभागाला सुयोग्य स्थान मिळवून द्यावे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस सरकारने गोवा मनोरंजन सोसायटीच्या माध्यमातून ‘फिल्म फायनान्स’ योजना सुरू केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेसमुळेच 2005 ते 2011 पर्यंत गोव्यातील जास्तीत जास्त चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागांमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पण दुर्दैवाने 2012 साली सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळात ही योजना पूर्णपणे बारगळली आणि त्यासोबतच गोवा मनोरंजन सोसायटीचे स्वरुप हे इफ्फीचे ‘ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी एजंट’ एवढीच राहिली असल्याची बोचरी टिका यावेळी दिगंबर कामत यांनी केली.

मला सांगण्यात आले आहे की कित्येक गोमंतकीय सिनेनिर्मात्यांना ‘फिल्म फायनान्स’चा निधी अद्याप वितरित करण्यातच आलेला नाही. सरकारने सदर योजना नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद ठेवली आहे याबद्दल काहिच अंदाज येत नाही. सरकारच्यावतीने कोणतीही ठोस मदत जर स्थानिक चित्रपट निर्मात्यांना केली नाही तर ते चित्रपट कसे बनवतील? असा थेट सवाल दिगंबर कामत यांनी केला

2008 ते 2011 दरम्यान काँग्रेस सत्तेमध्ये असताना इफ्फीचे पाच अधिकृत प्रोग्रामिंग विभाग गोवा मनोरंजन संस्थेच्या पूर्ण नियंत्रणाखाली होते. आम्ही त्यावेळी ‘गोवा ऑन सेल्युलॉइड’ विभाग केवळ गोमंतकीय चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सुरू केला. माझ्या सरकारच्या काळातच स्थानिक चित्रपट निर्मात्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात आला आणि गोव्यातील जास्तीत जास्त चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागांमध्ये प्रदर्शित केले गेले ज्यामुळे स्थानिक चित्रपट निर्मात्यांना चित्रपट वित्त योजनेंतर्गत अतिरिक्त लाभ मिळविण्यास मदत झाली, असे दिगंबर कामत यांनी नमूद केले.

गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे
गोव्यातील मच्छीमार अडकले समस्‍यांच्‍या ‘जाळ्यात’!

गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली असून गोव्यातील अनेक चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शनासाठी निवडले गेले आहेत. गोव्यातील चित्रपट उद्योगाबद्दल मनोरंजन संस्था डोळ्यावर पट्टी बांधून वावरू शकत नाही. इफ्फीच्या मंचावर अधिकाधिक गोमंतकीय सिनेमे कसे येतील आणि इफ्फीचा लाभ स्थानिक चित्रपट निर्मात्यांना कसा होईल, हे पाहणे त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com