Bicholim News : काँग्रेस उमेदवारांचा परिणाम नाही : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Bicholim News : दोन्ही मतदारसंघात भाजपचा विजय
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोण? त्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट गोव्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

शनिवारी सायंकाळी मुळगाव-डिचोली येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला. मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या साखळीसह डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात मिळून भाजप उमेदवाराला मतांची सर्वाधिक आघाडी अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant
Goa Extortion Case: खंडणी नव्हे, 'हायवे रॉबरी'; दिल्‍लीच्‍या व्‍यावसायिकांचा सुनियोजित पाठलाग, अनेक प्रश्न अनुत्तरीत

कार्यकर्त्यांचे बळ!

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विजयासाठी भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांचे बळ आणि जनतेच्या आशीर्वादामुळे गोव्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे ''कमळ'' निश्चित फुलणार.

असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. उत्तरेतून श्रीपाद नाईक एक लाखाहून अधिक मते, तर दक्षिणेतून पल्लवी धेंपे ६० हजाराहून अधिक मते मिळवून विजयी होणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com