Khandola News : ‘प्रियोळा’त काँग्रेस उमेदवार अनोळखी! मुख्यमंत्री सावंत

Khandola News : बेतकी-खांडोळ्यात श्रीपाद नाईक यांचा प्रचार, बिग बी परिसरात जाहीर सभा
cm
cmDainik Gomantak
Published on
Updated on

Khandola News :

खांडोळा, प्रियोळ मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला कोणीही ओळखत नसून येथील मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याची सवय नाही. भाजपसोबत मगोचाही पाठिंबा आहे, त्यामुळे भाजपा उमेदवार किमान १५ हजार मतांची आघाडी या मतदारसंघात घेणार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ता. ५ रोजी बेतकी-खांडोळ्यातील सभेत व्यक्त केला.

व्यासपीठावर योगी दिव्याशंकर (आदित्यनाथ योगी यांचे बंधू), श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री गोविंद गावडे, माशेल सरपंच जयेश नाईक, खांडोळा सरपंच विशांत नाईक, दामोदर नाईक, माजी सरपंच दिलीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले, भाऊंनी केलेला विकास काँग्रेसला दिसत नाही. महत्त्वपूर्ण असे १२०० प्रकल्प भाऊंनी गोव्यात पूर्ण केले. विविध पूल, आयुष हॉस्पिटल, विमानतळ, रस्तासारखे अनेक प्रकल्प पूर्ण झाले. पण हा विकास काँग्रेसला दिसत नाही. काँग्रेसचे अस्तित्वच कुठे नाही, देशभरातून फक्त ३० जागा त्यांना मिळतील. भाजप व मित्र पक्षांचा आकडा ४०० पार जाणार आहे. त्यामुळे भविष्यात देशाचा विकास झपाट्याने होणार आहे.

राम मंदिर, ३७० कलम, महिलांना ३३ टक्के आरक्षणा सारखे अनेक विषय भाजपने सोडविले आहेत. पुढील कार्यकाळात महिला, युवा, किसान विकासासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. भाजपला मत म्हणजे मोदींना मत, म्हणजेच देशविकासाला मत, स्वयंपूर्ण भारत, विकसित भारताला मत आहे.

cm
Bicholim News : लाईनमनच्या मृत्युनंतर वीजमंत्र्यांवर टीकेचे बाण; व्हाळशीतील दुर्घटना

भाजप हा आश्‍वासन पाळणारा पक्ष असून भविष्यात जगाचे नेतृत्व करण्याची शक्ती असलेला फक्त भाजप हा एकच पक्ष आहे. सक्षम नेतृत्वामुळे देशाचा विकास सुरू आहे. त्यामुळे विकाससाठी मतदान करा.

भाजपचे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजयी होणार असल्याचा विश्‍वास श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, कार्यकर्ते व मतदारांच्या सहकार्यामुळे पाच वेळा लोकसभेत मी गोव्याचे प्रश्‍न मांडले. ेविकास प्रकल्प राबविले. मोदींच्या नेतृत्वामुळे जगात भारताची प्रतिमा उज्ज्वल बनली आहे. माजी सभापती विश्‍वास सतरकर, दिलीप नाईक, मंत्री गोविंद गावडे, खासदार सदानंद तानावडे व इतरांनी विचार व्यक्त केले. श्रमेश भोसले, पंच विशांत नाईक यांनी आभार मानले. विनीत कुडईकर यांनी सूत्रसंचालन केले.

लुटारूंना बाजूला करा!

गोव्यात खलपांनी बॅंक लुटली आणि देशात काँग्रेसने विविध क्षेत्रात भ्रष्टाचार केला. अशा लोकांना आपण मतदान करणार का? मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. तेव्हा अशा लुटारूंना बाजूला करा आणि भाजपला मतदान करा. डबल इंजिन सरकारमुळे विकासा गती प्राप्त होते. तेव्हा केंद्रातही भाजप सत्तेवर येण्यासाठी दोन्ही उमेदवांना निवड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com