गोवा विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत.
Congress

Congress

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: गोव्यात विधान सभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रचाराला ही उधाण आले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. आज गोवा काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मडगाव मतदार संघातून काँग्रेस (Congress) नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत.

अशी आहे काँग्रेस उमेदवारांची यादी

  1. मडगाव मतदार संघातून काँग्रेस नेते दिगंबर कामत

  2. म्हापसा मतदार संघातून सुधीर कंदोळकर

  3. फोंडा मतदार संघातून राजेश वेरेंकर

  4. केपे मतदार संघातून अल्तीनो द कोस्टा

  5. कुंकळी मतदारसंघातुन युरी आलेमाव

  6. संकल्प आमोणकर मुरगाव मतदान संघातून

कुंकळ्ळीत काँग्रेसची उमेदवारी युरी आलेमाव यांना मिळणार की एल्विस गोम्स हे गुपित दूर करत काँग्रेसने युरी आलेमाव यांच्याच नावाला पसंती दिली, पण इतर समविचारी पक्षांबरोबर युती होणार की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे. केपे मतदारसंघात काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे एल्टन डिकॉस्टा यांच्या नावाला पसंती दिली आहे.

केंद्रीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज पहिल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मडगावात दिगंबर कामत, कुडतरी येथे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मुरगाव येथे संकल्प आमोणकर यांच्या नावाला पसंती दिली. मंगळवारी ‘गोमन्तक’ने दोन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस जाहीर करणार असे म्हटले होते आणि वरील उमेदवारांना उमेदवारी मिळणार असे म्हटले होते. ‘गोमन्तक’चा हा अंदाज खरा ठरला आहे. अन्य तीन उमेदवारांमध्ये म्हापसा येथे सुधीर कांदोळकर, ताळगाव येथे टोनी रॉड्रिग्ज, तर फोंडा येथे राजेश वेरेकर यांच्या नावांना पसंती दिली आहे. मंगळवारच्या बातमीत दाबोळी येथील उमेदवारी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना दिली जाणार अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, दाबोळीची उमेदवारी अद्याप कुणाला जाहीर केलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com