आता ‘बंगाली’त फालेरोंचे अभिनंदन

तृणमूलने राज्यात जी हवा निर्माण केली त्याचे मात्र अनेकांना आश्चर्च वाटत आहे
Congratulations to Falero in Bengali language
Congratulations to Falero in Bengali languageDainik Goamntak
Published on
Updated on

लुईझिन फालेरो (LUIZINHO FALERIO) यांच्या तृणमूल काँग्रेसमधील (Trinamool Congress) प्रवेशाच्‍या वृत्ताने राजकीय वातावरण (Politics) बदलून गेले आहे. तृणमूलची ही राज्यातील ‘एन्ट्री’ समाज माध्यमांनाही आकर्षित करीत आहेत. त्यामुळे लुईझिन यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. तसा त्यांचा अजूनही विधिवत प्रवेश व्हायचाच आहे. पण, तृणमूलने राज्यात जी हवा निर्माण केली त्याचे मात्र अनेकांना आश्चर्च वाटत आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आघाडीचा पक्ष असलेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्येही लुईझिन यांच्यावर बंगाली भाषेत पोस्टर्स काढत ते समाज माध्यमांवर व्हायरल केले आहेत. एकंदरीत, लुईझिन आता देशपातळीवर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Congratulations to Falero in Bengali language
Goa Election 2022: 'तृणमूल' हीच देशातील खरी काँग्रेस, लुईझिन फालेरो यांचा काँग्रेसवर घणाघात

काँग्रेस पक्षाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो आणि त्यांचे पाठीराखे येत्या बुधवारी कोलकात्यामध्ये होणाऱ्या एका समारंभात तृणमूल काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, लुईझिन फालेरो यांनी काल सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला.

Congratulations to Falero in Bengali language
जरा थांबा, आणखी लोक तृणमूल काँग्रेस पक्षात येतील: फालेरो

या कार्यक्रमाला स्वतः ममता दीदी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आश्चर्याची गोष्ट, म्हणजे लुईझिन फालेरो यांना अजूनपर्यंत तृणमूल काँग्रेसचे एकही पदाधिकारी किंवा ज्येष्ठ नेते भेटलेले नाहीत. त्यांचा संपर्क अजूनपर्यंत ‘आय पॅक’चे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या बरोबरच आला. प्रशांत किशोर एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आले, त्यावेळी त्यांनी फालेरो यांची भेट घेऊन त्यांना राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. गोव्यातच फालेरो यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशाचा बार उडवून देण्याचा प्रस्ताव होता, परंतु ममता बॅनर्जी यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे गोव्यात येणे शक्य झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com