Calangute Restaurant Fire: पॉश-नॉश नाईट क्लबच्या आगीबाबत संभ्रम

देव्हाऱ्यातील वातीमुळे भडकली आग; कामगाराचे म्हणणे
Calangute Restaurant Fire
Calangute Restaurant FireDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Restaurant Fire: खोब्रावाडा-कळंगुट येथील हॉटेल लिंडानजीक असलेल्या पॉश-नॉश नाईट क्लबला गुरुवारी रात्री आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. बार्देशातील म्हापसा, पिळर्ण तसेच पर्वरी येथील अग्निशमन दलाच्या एकूण सहा बंबांचा वापर करीत रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत मतभिन्नता आढळून आली.

Calangute Restaurant Fire
Sanquelim : पाळी-वेळगेतील रस्ता रुंदीकरण गतीने! खाण उद्योगासाठी उपयुक्त

क्लबच्या कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील देव्हाऱ्यातील दिव्यांच्या वातीजवळ कापडाचा पडदा आल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. तर क्लब मालकाने वेगळीच माहिती दिल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कळंगुट-बागा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या येथील तीन मजली इमारतीत असलेल्या पॉश-नॉश क्लबच्या दुसऱ्या मजल्यावर संध्याकाळी 7 च्या सुमारास ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गेल्या वीस वर्षांत कळंगुटचा पर्यटनदृष्ट्या मोठा विकास झाला आहे. परंतु त्यामानाने सुविधा मिळालेल्या नाहीत. या भागात घरे, इमारती, हॉटेल्स दाटीवाटीने उभी असल्याने आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होते. अनेकांकडे अग्निरोधक उपकरणेही नसतात. त्यामुळे अग्निशमन दल तसेच स्थानिक पंचायत मंडळाकडून अशा हॉटेल्सची चौकशी व्हायला हवी.

-दत्तप्रसाद दाभोलकर (जि.पं.सदस्य, कळंगुट)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com