Dabolim News : दाबोळीतील घटनेबद्दल काँग्रेसकडून शोक; कायदा व सुव्यवस्था ढासळली

Dabolim News : दाबोळी येथे काल एका पाच वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार व हत्येच्या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबद्दल भाजपवर टीका केली.
Dabolim Crime
Dabolim CrimeDainik Gomantak

Dabolim News :

मडगाव, एका पाच वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार धक्कादायक आहे.

आपला जीव गमावलेल्या त्या निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने गोवा हे गुन्हेगारीचे ठिकाण बनले आहे. सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची माझी मागणी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

Dabolim Crime
Goa Film City Project : लोलयेत ‘फिल्म सिटी’ला थारा देऊ नका; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

दाबोळी येथे काल एका पाच वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार व हत्येच्या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबद्दल भाजपवर टीका केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात गोव्यात गुन्हेगार मोकळे आहेत. निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पूर्ण अपयशामुळे आणखी एका निष्पापाचा जीव गेला. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाप्रती माझी मनापासून सहानुभूती आणि संवेदना. या निर्दयी घटनेत गुंतलेल्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, असे केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी सांगितले.

पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या अशा घटनांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि भीतीची भावना निर्माण होते आणि गोव्याची प्रतिमा कलंकित होते. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात सरकार कुचकामी ठरल्याचे या घटनांवरून दिसून येते.

पोलिस हे विरोधी सदस्यांच्या मागे लागण्यासाठी नसून गुन्हे रोखण्यासाठी आहेत असा टोला हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी हाणला आहे.

दाबोळीतील धक्कादायक घटनेने मी व्यथित झालो आहे. नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची भीती नाही.

- कॅप्टन विरियातो फर्नांडिस

निष्पाप बालिकेच्या बलात्कार आणि हत्येने भाजप सरकारचे नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेले अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे. गोवा आता गुन्हेगारीचे ठिकाण बनले आहे. निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे.

- ॲड. रमाकांत खलप

कामगारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा हवी : आवडा

गोव्यात बांधकाम क्षेत्रातील कामगार असुरक्षित वातावरणात काम करत असून त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा मिळण्याची गरज बायलांचो एकवट या संघटनेच्या अध्यक्ष आवडा व्हिएगस यांनी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

हे कामगार उघड्या खोपटात रहात आहेत, त्यांना दारांना कडी असलेल्या जागेत ठेवणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच कामगारांच्या लहान मुलांची देखभाल करण्यासाठी बिल्डरने खास ‘केअर टेकर’ची व्यवस्था करण्याची गरज आहे. यासाठी समाज कल्याण खाते, कामगार खाते आणि स्थानिक पंचायतीने एकत्र येऊन उपाययोजना आखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com