Summer Camp : परपॅच्युअल कॉन्व्हेंटच्या उन्हाळी शिबिराचा समारोप

Summer Camp : शाळेतर्फे आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी आमोणकर मुख्य पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
 Summer Camp
Summer CampDainik Gomantak

Summer Camp :

सासष्टी, मुलांनी आपल्या आई-वडिलांचा तसेच शिक्षकांचा आदर करावा. शिक्षण घेतानाच आपल्या अंगातील कलागुणांना नाही वाव देऊन समाजात आपले चांगले नाव कमवावे, असे उद्‌गार कविता आमोणकर यांनी बुधवारी नावेली येथील परपॅच्युअल सुकूर कॉन्व्हेंट हायस्कूल येथे काढले.

शाळेतर्फे आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी आमोणकर मुख्य पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिबिया फर्नांडिस तसेच व्यवस्थापिका सिस्टर हिल्डा लोपेज यांची उपस्थिती होती.

उन्हाळी शिबिराअंतर्गत मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले होते. भिंतीवर सुंदर चित्रे रंगवणे, बॉटल पेंटिंग, मेणबत्ती तयार करणे, ज्यूस तयार करणे, शोभेच्या वस्तू तयार करणे आदी उपक्रम या शिबिराअंतर्गत राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तिपत्रके वितरित करण्यात आली.

 Summer Camp
Goa Ex-Ranji Players In NCA: गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू 'एनसीए'त; स्वप्नील अस्नोडकर फलंदाजी प्रशिक्षक

कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्याध्यापिका सिस्टर लिबिया यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेनीना फर्नांडिस, स्विनी फर्नांडिस आणि दियाद्रे डायस यांनी केले. आभार मारिया रिबेलो फुर्तादो यांनी मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com