Goa Ex-Ranji Players In NCA: गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू 'एनसीए'त; स्वप्नील अस्नोडकर फलंदाजी प्रशिक्षक

Goa Ex-Ranji Players In NCA: एनसीएचे 19 वर्षांखालील शिबिर राजकोट येथे होईल. तेथे स्वप्नील फलंदाजी प्रशिक्षक असतील.
Goa Ex-Ranji Players In NCA
Goa Ex-Ranji Players In NCADainik Gomantak

Goa Ex-Ranji Players In NCA

गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती, निनाद पावसकर, विवेक मिश्रा आणि सलमा दिवकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

एनसीएचे 19 वर्षांखालील शिबिर राजकोट येथे होईल. तेथे स्वप्नील फलंदाजी प्रशिक्षक असतील. 16 वर्षांखालील वयोगटातील एनसीए शिबिर मुंबईत होणार असून तेथे शदाब यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

सालेम येथे होणाऱ्या एनसीए 19 वर्षांखालील शिबिरात निनाद तंदुरुस्ती मार्गदर्शक असतील. नागपूर येथे होणाऱ्या एनसीए 19 वर्षांखालील मुलींच्या शिबिरात सलमा दिवकर तंदुरुस्ती प्रशिक्षक असतील. सुरत येथे होणाऱ्या एनसीए 16 वर्षांखालील शिबिरासाठी विवेक यांची फिजिओथेरापिस्ट म्हणून निवड झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com