'हळर्ण बंधाऱ्याचे काम पूर्ण करा'

मोपा पीडित संघटना: बैलपार व साळ नदीवरील खर्च अनाठायी
Alorna dam
Alorna damDainik Gomantak

मोरजी: पेडणे तालुक्यातील हळर्ण - धुमासे दरम्यान असलेल्या शापोरा नदीच्या गोड्या पाण्यावर अर्धवट अवस्थेत असलेल्या बंधाऱ्याची नव्याने डागडुजी करून हा बंधारा विकसित करून वापरात आणल्यास त्याचा फायदा पेडणे आणि डिचोली या दोन तालुक्यातील लोकांना होणार आहे. तसेच त्यासाठी खर्चही कमी येणार आहे, अशी मागणी मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित संघटनेचे उदय महाले यांनी केली आहे. तसेच बैलपार येथे केलेला खर्च, त्यानंतर साळ नदीवर पंप हाउस उभारण्यासाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च अनाठायी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Alorna dam
गोव्यात ब्लॅक पँथरचा वावर; विश्वजित राणेंनी शेयर केला फोटो

काही वर्षांपूर्वी पेडणे तालुक्यातील हळर्ण आणि डिचोली तालुक्यातील धुमासे भागात अर्धवट अवस्थेत बांधलेला बंधारा आहे. तेथून आजुबाजूच्या गावात शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याची शासनाची योजना होती. धुमासे भागात बंधारा बांधण्याची सुरवात झाली होती, तर त्याच दरम्यान हळर्ण भागात पंप हाउसची उभारणी करून त्या ठिकाणी पंप बसवले होते. त्यासाठी वीजपुरवठा केला होता. तसेच हळर्ण येथील वेताळ मंदिराच्या शेजारी असलेल्या हळर्ण - इब्रामपूर रस्त्या शेजारच्या खांबावरून पंप हाउसपर्यंत विजेचे खांब उभारून वीजपुरवठा केला होता. शापोरा नदीत मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा साठा असून पाणीपुरवठ्याच्या कितीही योजना राबविल्या तरी त्या नदीचे पाणी आटणार नाही. तिळारी नदीचे पाणी याच शापोरा नदीत जाऊन मिळते. त्यामुळे बैलपार नदीच्या काठावर उभारलेला पंप हाउस हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Alorna dam
बालपणीच कला आत्मसात कराव्यात: दिलायला लोबो

बैलपार नदीवर 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाउस उभारण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. तसेच या ठिकाणी बैलपार नदीत पाण्याची पातळी खालावली, तर साळ नदीतील पाणी आणून बैलपार नदीच्या पात्रात घालण्यासाठी साळ नदीवर दुसरा प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी आणखी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्याऐवजी हळर्ण येथे शापोरा नदीवर अर्धवट अवस्थेत असलेल्या बंधाऱ्याची दखल घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित संघटनेचे पदाधिकारी उदय महाले, बाबुराव गाड, सागर गाड यांनी हळर्ण - धुमासे दरम्यान अर्धवट अवस्थेत असलेल्या बंधाऱ्याची पाहाणी केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com