शपथविधीवरील 5.59 कोटी खर्चाची ‘कॅग’कडे तक्रार, चौकशीची मागणी

5.59 कोटींचा खर्च म्हणजे ही सरकारी तिजोरीची उधळपट्टी
Complaint to CAG about crores spent on swearing in ceremony of cm pramod sawant
Complaint to CAG about crores spent on swearing in ceremony of cm pramod sawantSandip Desai
Published on
Updated on

पणजी : राज्याच्या शपथविधी सोहळ्यावर झालेल्या अनाठायी 5.59 कोटींच्या खर्चाची महालेखापालने (कॅग) चौकशी करण्याची मागणी ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीत केली आहे. करदात्यांच्या पैशांचा चुराडा करण्यात आला असून त्यातून जनतेला काहीच लाभ झालेला नाही असे त्यांनी म्हटले आहे. (Complaint to CAG about crores spent on swearing in ceremony of cm pramod sawant)

मुख्यमंत्री व आठ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भव्यदिव्य शामियाना उभारून अवाढव्य खर्च करण्यात आला आहे. या खर्चावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने तसेच त्यासाठीची आवश्‍यक असलेली प्रक्रिया धाब्यावर बसवून एका खासगी एजन्सीला हे काम देण्यात आले होते. या कंपनीने अगोदर दिलेले बिल मागे घेऊन त्यात वाढ करून पुन्हा सादर करण्यात आले आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणात मोठा गैरप्रकार झाला असल्याचा संशय रॉड्रिग्ज यांनी व्यक्त करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी असे म्हटले आहे.

Complaint to CAG about crores spent on swearing in ceremony of cm pramod sawant
मडगाव पालिकेचा नियोजनशून्य कारभार; सुस्थितीत असलेल्या गाड्या वापराविना गॅरेजमध्ये

माहिती हक्क कायद्याखाली मिळवेल्या माहितीनुसार सरकारने केलेल्या खर्चाची माहिती मिळवण्यात आली आहे. त्यामध्ये स्टेडियमची भाडेपट्टी, प्रसिद्धी तसेच पोलिसांसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही. हे कंत्राट एकाच एजन्सीला दिले जाण्याचे पूर्वनियोजित ठरवण्यात आले होते. शपथविधी सोहळ्याला काही दिवस बाकी असताना कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया करून हे काम वेळेत पूर्ण होणार नाही असे कारण फाईलवर नोंदविलेल्या नोंदणीत उघड झाले आहे. या कामाचे कंत्राट त्या एकाच एजन्सीला देण्याच्या हालचाली एकादाच दिवशी सर्व खात्यामधून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत फाईल पोहचेपर्यंत घडले आहे.

सरकारने एखाद्या कामासाठी कोट्यवधीची उलाढाल करून खर्च केला तर त्याचा राज्यातील जनतेला कोणता लाभ झाला त्याचे त्यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. सरकारने खर्च केलेला पैसा हा करदात्यांचा आहे. 18 मिनिटांच्या शपथविधीवर 5.59 कोटींचा खर्च म्हणजे ही सरकारी तिजोरीची उधळपट्टी आहे. सरकारच्या समाजकल्याणकारी योजनांखालील लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांचे आर्थिक सहाय्य देणे सरकारला शक्य झालेले नाही. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना या सोहळ्यावर अवाढव्य खर्च करण्यास सरकारकडे पैसे आहेत. याप्रकरणाची कॅगने चौकशी करण्याची मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com