Goa Police : अधिक्षक धानिया यांच्याविरुद्धची तक्रार गृह मंत्रालयाच्या संघप्रदेश विभागाकडे वर्ग

कुतीन्हो यांनी आपल्याला होत असलेल्या कथीत छळवणूकीची तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली होती.
South Goa SP Abhishek Dhaniya
South Goa SP Abhishek DhaniyaDainik Gomantak

मडगाव (खास प्रतिनिधी) : आपल्या विरोधात कुठल्याही न्यायालयात वॉरंट प्रलंबित नसताना ते प्रलंबित असल्याची खोटी माहिती केंद्र सरकारच्या आयबी विभागाला देऊन आपल्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यास दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक अभिषेक धानीया यांनी भाग पाडले अशा आशयाची नावेली येथील व्यवसायिक फ्लोयड कुतीन्हो यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला केली होती. त्या तक्रारींची दखल घेत पुढील कारवाईसाठी या मंत्रालयाच्या संघप्रदेश विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. (South Goa SP Abhishek Dhaniya)

दरम्यान कुतीन्हो यांनी आपल्याला होत असलेल्या कथीत छळवणूकीची तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली होती. यावरची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली असून पोलीस अधीक्षक धानिया आणि मायणा कुडतरी पोलीस निरीक्षकानी हजर राहावे अशी नोटीस आयोगाने काढली आहे.

कुतीन्हो यांच्या विरोधात मडगाव न्यायालयाचे एक वॉरंट प्रलंबित असतानाही ते परदेशात गेले आहेत तेव्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठीं लूक आऊट नोटिस जारी करावी अशी मागणी गोवा पोलीसांच्या वतीने करण्यात आली होती.

हे पत्र धानिया यांनी पाठविले होते. मात्र कुतीन्हो यांनी माहिती हक्क अधिकाराखली माहिती मागितली असता त्यांच्यावर कुठल्याही न्यायालयाचे वॉरंट प्रलंबित नसल्याची माहिती मिळाली होती.

मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर हे आपल्याला एका खोट्या प्रकरणात गुंतवू पाहत असून एकोस्कर यांच्या सांगण्यावरून धानिया यांनी ही खोटी माहिती केंद्रीय यंत्रणाना पुरविली असा कुतीन्हो यांचा आरोप आहे.

धानिया एगमुट कॅडरमधील आयपीएस अधिकारी असल्याने ही तक्रार संघप्रदेश विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अव्वल सचिव संजीव कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान या तक्रारी संदर्भात कुतीन्हो यांच्याकडे कुठलीही माहिती असल्यास ती पुराव्यासह 15 दिवसात वरील विभागाला सदर करावी असेही अन्य एका पत्रातून कुतीन्हो याना सुचविले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com