Mahadayi River: राजकारण्यांच्या मतावर सामान्य लोकांच्या ‘नो कमेंट्स’

Mahadayi River: नेटकरी शांत पण व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Public
Public Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi River: म्हादईच्या कळसा-भांडुरा या प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय कुरघोड्यांवर सध्या नेटकरी शांत दिसत आहे. त्याशिवाय कोणत्याही नेत्यांच्या मतावरही नेटकरी व्यक्त होताना दिसत नाहीत. त्यांच्या समाजमाध्यमांतील व्हिडिओंना पाहणाऱ्यांची संख्या अधिक वाढली असूनही व्यक्त होणाऱ्यांची संख्या अगदीच नसल्यासारखीच आहे.

म्हादईच्या प्रकरणावरून सध्या सर्व पक्षांचे नेते व्यक्त होताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा मंत्रीगण आपली मते समाजमाध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. त्याशिवाय विरोधी गटातील नेतेही त्यात काही कमी नाहीत.

परंतु केवळ या नेत्यांची मते ऐकणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसते. ज्यांचे समर्थक आहेत, त्यातील एखादा-दुसरा त्या नेत्याच्या मतांचे समर्थन करीत आहे. परंतु पर्यावरणप्रेमी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मतांवर प्रतिक्रिया देणारे मात्र समाजमाध्यमांत दिसतात.

Public
Kalasa Project: मलप्रभेच्या काठावरील गावांना पुराचा धोका तीव्र - राजेंद्र केरकर

राजकीय नेत्यांनी म्हादई नदीच्या पाण्याविषयी किती गंभीर भूमिका घेतली हे नेटकऱ्यांनाही आता समजून आले आहे, त्यामुळे केवळ समाजमाध्यमांतील मते ऐकून घेण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mandovi River Sewage Pollution
Karnataka Supreme Court Cases
Goa Assembly Session Public Issues
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com