Colvale Jail News
Colvale JailDainik Gomantak

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Undertrial prisoner beaten Goa: एका एनडीपीएस प्रकरणात मोहम्मदची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली होती.
Published on

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका अंडर ट्रायल कैद्याला, आठ ते दहा जणांच्या कैद्यांकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

मोहम्मद रेहान असे पीडित कैद्याचे नाव आहे. कारागृहाच्या आतमध्येच झालेल्या या घटनेमुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एका एनडीपीएस प्रकरणात मोहम्मदची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या आवारातच आठ ते दहा कैद्यांनी, वरील अंडर ट्रायल कैदी मोहम्मद याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला व शरीराच्या इतर भागावर गंभीर दुखापत झाली.

Colvale Jail News
सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा संप

प्रलंबित मागण्यांसंबधी चालढकल होत असल्याने मुरगाव पालिकेच्या कार्यालयातील सफाई तसेच इतर कामगार ती शुक्रवारी (ता. २४) एक दिवशीय 'पेन व टूल्स डाऊन' संप केला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्ही शुक्रवारी (ता. २४) एक दिवशीय संप पुकारणार असल्यासंबंधी नोटीस गुरुवारी दिली होती.

त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून त्यांनी संप पुकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पेन डाऊन केले, तर सफाई कामगार, चालक व इतर कामगारांनी टूल्स डाऊन केले. त्यामुळे मुरगाव पालिकेच्या दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला. सर्व कामगारांनी मुरगाव पालिका कार्यालय इमारतीसमोर जमून जोरदार घोषणा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com