Colvale: सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी कोल्हापूरच्या चोरट्यास कोलवाळ येथे अटक

स्थानिकांनी चोरट्याला रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली.
Colvale Theft Case
Colvale Theft Case

Colvale Theft Case: सहकार गृहनिर्माण सोसायटीत सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी चंदगड, कोल्हापूर येथील एकाला अटक करण्यात आली आहे. कोलवाळ येथे आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

24 वर्षीय युवक बांधकाम साईटवरुन प्लेट चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. स्थानिकांनी चोरट्याला रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली.

विठोबा गावडे (वय 24, रा. रेवोडा, मूळ चंदगड, कोल्हापूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका स्थानिकांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, तो समाज माध्यामांवर व्हायरल होत आहे. संशयित चोरट्याला तू चोरी केलीस का असा प्रश्न विचारल्यावर त्यांने हो म्हणत, मी चोरी केलेल्या प्लेट माघारी करतो असे सांगितले.

हा व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com