Goa Police: गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Goa Police: आसगाव प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत सापडलेले गोवा पोलिस पुन्हा एका प्रकरणामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे.
गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
Goa PoliceDainik Gomantak

आसगाव घर पाडाव प्रकरणात पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणा उघड झालेला असतानाच आता कोलवा पोलीस स्‍थानकावरील एका उपनिरीक्षकाचेही प्रताप उघड झाले आहेत.

या पोलीस स्‍थानकावर आपली कैफियत देण्‍यासाठी आलेल्‍या एका महिलेला या पोलीस स्‍थानकावरील एका उपनिरीक्षकाने काळेनिळे पडेपर्यंत मारहाण केल्‍याचे उघड झाले असून या उपनिरीक्षकाला त्‍वरित निलंबित करा अशी मागणी बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी केली आहे.

व्‍हिएगस यांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे, रविवारी (दि. 30 जून) ही महिला कोलवा पोलिस स्‍थानकावर गेली होती. त्‍यावेळी त्‍या उपनिरीक्षकाने तिला धमकावण्‍यास सुरुवात केली.

त्‍यानंतर तिला जबर मारहाण करत आपले बूट चाट असे म्‍हणत तिला आणखी मारहाण केली. यामुळे त्‍या महिलेच्‍या दंडावर काळे वळ उठले. ही मारहाण अमानुष अशी होती.

या संदर्भात आज व्‍हिएगस यांनी दक्षिण गोव्‍याच्‍या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांची भेट घेऊन या उड्‍डाम पोलीस निरीक्षकाला त्‍वरित निलंबित करा आणि चौकशी करा अशी मागणी केली आहे. अन्‍यथा आपण या संदर्भात आवाज उठवू असा इशारा व्‍हिएगस यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com