

मडगाव: आयकॉनिक बीच म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या कोलवा समुद्रकिनाऱ्यालगत असलेली खाडी सध्या प्रदूषित झाली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलसंपदा विभाग व सांडपाणी विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान चाचणीसाठी खाडीच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून, या पाण्याची तपासणी करून खाडीतील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे.
या पाहणीवेळी स्थानिक सरपंच तेरेझा सिल्वा तसेच कोलवातील काही नागरिक उपस्थित होते. या खाडीतील प्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रार दाखल केली होती. या खाडीत सांडपाणी सोडले जात असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.
मात्र, हे सांडपाणी नेमके कोठून येते, हे शोधणे गरजेचे असल्याचे मत सिल्वा यांनी मांडले. काही आस्थापनांकडून खाडीत सांडपाणी सोडले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.