Dabolim Tanker Accident: फॉस्फरिक अ‍ॅसिड वाहून नेणाऱ्या 2 टँकरची धडक; दाबोळीत अपघात

राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वारांना वाचविण्यासाठी अचानक मारला ब्रेक
Dabolim Tanker Accident:
Dabolim Tanker Accident:Dainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Tanker Accident: दाबोळी येथे रसायन वाहून नेणाऱ्या दोन टँकरची धडक झाली आहे. या टँकरमधून फॉस्फरिक अॅसिड वाहून नेण्यात येत होते.

सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झालेली नाही. तथापि, रसायन वाहून नेणारे टँकर असल्याने याबाबत भीती व्यक्त केली जात होती.

Dabolim Tanker Accident:
CM On Migrant Workers: गोव्यातील गुन्ह्यात परप्रांतीयांचाच हात; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वारांना वाचविण्यासाठी पहिल्या टँकरने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येत असलेला टँकर पहिल्या टँकवर आदळला.

मुरगाव पोर्टमधून फॉस्फरिक अॅसिड घेऊन हे टँकर प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड (झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड) येथे निघाले होते. त्यावेळी दाबोळी जवळील वेल्स औद्योगिक वसाहत येथील जंक्शन जवळ हा अपघात झाला.

समोरून एका दुचाकीवरून तिघे जण येत होते. ते विरूद्ध दिशेने येत होते. त्यांना वाचविण्यासाठी टँकरचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून आलेला टँकर समोरच्या टँकरवर आदळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com