Goa Crime: 'गर्लफ्रेंड' वरून डिचोलीत कॉलेजचे विद्यार्थी भिडले; मारामारीत दोनजण जखमी

Bicholim Goa Crime News: मारामारीची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला.
College students clash over girlfriend, two injured
Student fight over girlfriendDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शहरातील एका हॉटेलच्या बाहेर झालेल्या मारामारीत दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ मारामारीचा हा प्रकार काल (बुधवारी) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

मारामारीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, 'गर्लफ्रेंड' वरून ही मारामारी झाल्याची शक्यता आहे. तशी चर्चाही शहरात सुरू आहे. जखमी विद्यार्थी एकाच महाविद्यालयातील असून, एक शहरातील तर दुसरा मये परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या मारामारीसंदर्भात मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

College students clash over girlfriend, two injured
Goa Cabinet Decision: प्रीपेड वीज मीटर, बांबोळीतील स्टेडियम भाडेपट्टीवर दिलं जाणार; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

वादाचे पर्यवसान मारामारीत

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी महाविद्यालयात या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. रात्री या वादाचे मारामारीत रूपांतर झाले. मारामारीची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून ते पुढील तपास करीत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rising crime against women in Goa
 NEET Exam Cancellation 2026
Bicholim Hit And Run Case
Bee Attack at Foundation Ceremony in Bicholim
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com