Panaji News : तानावडेंविरुद्ध आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी काँग्रेसची तक्रार

Panaji News : राहुल गांधींवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात गुरुवारी (ता.२१) काँग्रेस पक्षाने आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही तक्रार दिली आहे. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, सांताक्रुझ गटाध्यक्ष जॉन नाझारेथ, पणजी महिला मंडळाच्या अध्यक्ष लॅवेनिया डिकॉस्ता, जुझे कार्मिनो आणि इक्बाल शेख यांची उपस्थिती होती. पोलिस स्थानकातही तक्रार दिली जाणार आहे. त्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाठविली जाणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

महाभारत आणि रामायण या काळातील विविध शक्तींचे उदाहरण देत पाटकर म्हणाले, राहुल गांधींनी मुंबईतील शिवतीर्थावरील सभेत ‘हिंदू धर्मातील शक्ती’चा उल्लेख केला. महाभारतात पांडव आणि कौरवांची शक्ती आहे, रामायणात श्रीराम आणि रावणाची शक्ती आहे.

Panaji
Goa Education: विद्याशाखांचे एकत्रीकरण, पण पर्यायांवर मर्यादा!

तानावडे यांनी या शक्ती हिंदू धर्मात नाहीत, हे सांगावे. आमचे नेते राहुल गांधी हे ‘सत्याच्या शक्तीच्या’ बाजूने आहेत.

भाजप आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना फक्त ‘असत्याची शक्ती’ माहीत असावी. राहुल गांधी यांच्याविषयी लोकांमध्ये नकारार्थी जनमत तयार करण्याचे काम भाजपकडून सतत होत आहे. धर्माचा गैरवापर करून लोकांमध्ये नकारात्मकता पसरवण्याचे काम भाजप करीत आहे.

कडक कारवाई करावी!

निवडणूक आयोगाचे आचारसंहितेविषयी जे नियम आहेत, त्यानुसार तानावडे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. हे लोक अर्थाचे अनर्थ करीत आहेत. भाजपने आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. ‘विकसित भारत’ हा कार्यक्रम घेऊन भाजप लोकांना लॉलिपॉप दाखवीत आहेत, असा आरोप पाटकरांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com