Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Goa Coconut Production Decline: गत दीड ते दोन महिन्यांपासून नारळाच्या किमती स्थिर आहेत. आम्ही तीन प्रतींचे नारळ अनुक्रमे २४, २८ व ३२ रुपये दराने विकत आहोत.
Goa Coconut Production Decline
Goa Coconut PricesDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गत दीड ते दोन महिन्यांपासून नारळाच्या किमती स्थिर आहेत. आम्ही तीन प्रतींचे नारळ अनुक्रमे २४, २८ व ३२ रुपये दराने विकत आहोत. मात्र, काहींनी हा दर ५० ते ६० रुपये असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. हे योग्य नाही, असे नारळ विक्रेते शंकर सावंत यांनी सांगितले.

चतुर्थीलादेखील नारळाच्या किमती वाढणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. गोव्यात माकड व इतर जनावरांमुळे नारळाचे उत्पादन कमी होत आहे. नारळ पाडण्यासाठी मजूर उपलब्ध नाहीत. भाटकार हतबल आहेत. भाटांमध्ये काम करून काहीच उपयोग नाही, असे भाटकार म्हणतात, असे सावंत यांनी सांगितले.

Goa Coconut Production Decline
Goa Illegal Construction: जमीन अभिलेखांमध्ये कथित फेरफार; किनारी बेकायदा बांधकामांप्रकरणी कोर्टाची सरकारला नोटीस

इतर राज्यांतून आयात

एका भाटकाराकडून आम्ही ४० ते ५० हजार नारळ विकत घेत होतो. यावेळी केवळ १५ हजार नारळ मिळाले, असे त्याने सांगितले. सध्या गोव्यात नारळ दावणगिरी, तमिळनाडू व कर्नाटकातील इतर भागांतून आणावा लागतो, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com