
कामुर्ली: निष्पाप मुक्या जीवांना वाचवण्यात गोव्यातील एका स्थानिकाला यश आले आहे. कामुर्ली येथे एका स्कूटरच्या इंजिनमध्ये दडून बसलेल्या सापाला सर्पमित्र जॉन फर्नांडिस यांनी सुखरूप बाहेर काढले. या घटनेने परिसरात काही काळ उत्सुकता निर्माण झाली होती आणि सध्या सगळेजणं त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटरच्या इंजिनच्या कव्हरमध्ये एक साप असल्याची माहिती जॉन फर्नांडिस यांना मिळाली. सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्कूटरच्या आतमध्ये दडून बसलेल्या सापाला बाहेर काढणे हे एक आव्हान होते. त्यासाठी, जॉन फर्नांडिस यांना स्कूटरचे इंजिन कव्हर उघडावे लागले. मोठ्या कौशल्याने आणि संयमाने त्यांनी सापाला कोणतीही इजा न पोहोचवता त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.
अनेकवेळा साप बाहेर धडपडत होता. तरीही जॉन फर्नांडिस यांनी संयम न गमावता प्रयत्न सुरु ठेवले आणि शेवटी सापाला सुखरूप जीवनंदन दिलं. यांच्या या प्रयत्नाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप आणि इतर सरपटणारे प्राणी निवाऱ्याच्या शोधात घरांमध्ये किंवा वाहनांमध्ये आश्रय घेतात. अशावेळी, नागरिकांनी सतर्क राहून सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.