Mormugao Accident News: मुरगाव सडा येथून कोळसा व बॉक्साईड मालवाहू ट्रकच्या वाहतूकीमुळे जेटी, रुमडावाडा, एलमॉत परिसरातील जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. सोमवारी सायंकाळी सडा येथून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकी धडक दिल्याने अपघात झाला आहे.
अपघात रुमडावाडा येथे झाला. या अपघातात ट्रकने दुचाकी चालकाला ठोकर मारल्याने दुचाकी चालक जखमी झाला. मुरगाव पोलिसांनी अपघातस्थळी येऊन जखमी दुचाकी चालकाला चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मुरगाव सडा ते एलमॉत थियटर - आयओसी उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना जाण्यास रस्ता सुचित न करता, त्यावरून मुरगाव बंदरातील कोळसा-बॉक्साईड मालवाहू ट्रक जात असल्याने अपघात होत असल्याचा आरोप बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टचे सर्वेसर्वा परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.
वास्को येथून मुरगाव सडा येथे दुचाकी चालक जात असताना, सडा येथून वास्को येथ जात असलेल्या मालवाहू ट्रक व दुचाकी मध्ये रुमडावाडा येथे अपघात झाला. अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. डॉक्टरांनी जखमी दुचाकी चालकावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.
या अपघात प्रकरणी ट्रक चालक व दुचाकी चालकांमध्ये मध्यस्थी झाली असल्याने प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मुरगाव बंदरातील अवजड वाहने मुरगाव बंदरातील गेट क्रंमाक एक मधून हार्बर-सडा राष्ट्रीय महामार्गावरून जाणे क्रमप्राप्त असताना बंदरातील अवजड वाहने वास्को ते सडा मार्गाचा उपयोग करीत आहेत.
वास्को वाहतुक पोलिस व मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालक, मुरगाव तालुका उपजिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी लक्ष देणे आवश्यक असल्याची माहिती सोनुर्लेकर यांन दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.