CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत तेलंगणाच्या दौऱ्यावर; विकसित भारत यात्रेचे करणार उद्घाटन

हैदराबाद येथे विकसित भारत यात्रेचे उद्घाटन ते ओडिशाचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांच्या उपस्थितीत करणार आहेत.
CM Pramod Sawant Telangana Visit
CM Pramod Sawant Telangana VisitDainik Gomantak

CM Pramod Sawant Telangana Visit

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (ता. 20) तेलंगणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबाद येथे विकसित भारत यात्रेचे उद्घाटन ते ओडिशाचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांच्या उपस्थितीत करणार आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, त्यानंतर ते तेथील विकराबाद जिल्ह्यातील राजेश्वरी क्लस्टर यात्रेची सुरवात करणार आहेत. यापूर्वी केरळमध्ये भाजपच्या प्रचाराची सुरवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली होती.

मुख्यमत्र्यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन एसटी आरक्षणाबाबत चर्चा केली होती. सावंत यांनी केलेल्या चर्चेवेळी एसटी आरक्षणाचा विषय मांडला. दिल्ली दौऱ्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. गेले तीन दिवस मुख्यमंत्री सावंत, मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. अधिवेशनाच्या अगोदर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिगण आणि आदिवासी समाजातील नेत्यांबरोबर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com