Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: मोबाईल, टीव्हीच्या अतिरेकामुळे दृष्टी क्षीण, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; 12 हजार मुलांना मोफत चष्म्याचे वाटप

Eye Health Initiative for Children: पाल्याला दिसण्यात अडचण येते की नाही, याची दखल पालकांनी घेतली पाहिजे. अलीकडे मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे १८ वर्षांखालील मुलांना चष्मा लागू लागला आहे.
Published on

पणजी: पाल्याला दिसण्यात अडचण येते की नाही, याची दखल पालकांनी घेतली पाहिजे. अलीकडे मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे १८ वर्षांखालील मुलांना चष्मा लागू लागला आहे. आम्हाला चष्मा लागण्यासाठी वयाची पन्नाशी गाठावी लागली. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर वैद्यकीय उपचार केले पाहिजेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या १२ हजार विद्यार्थ्यांना सरकारने मोफत चष्म्यांचे वाटप केले आहे. दृष्टीदोष असलेल्या ८-९ जणांवर छोटी शस्त्रक्रियाही केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठीच्या खर्चाला बैठकीत कार्योत्तर मंजुरी देण्यात आल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, स्वयंपूर्ण गोवा योजनेंतर्गत २ लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. दृष्टीदोष असावा, असे वाटणाऱ्या ३३ हजार विद्यार्थ्यांची डॉक्टरांनी विशेष तपासणी केली. त्यापैकी १२ हजार जणांना चष्मे मोबाईल, टीव्हीच्या अतिरेकामुळे दृष्टी क्षीण देण्यात आले, तर ८-९ जणांवर शस्त्रक्रिया केल्या.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, नोकर भरती ही गुणवत्तेवर व्हावी असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी कर्मचारी भरतीतून मानवी हस्तक्षेप उणा केला जात आहे. संगणकावर आधारित परीक्षा घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. जनतेने कर्मचारी भरती ही गुणवत्तेवरच होणार, याची खात्री बाळगावी.

Goa CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंतांचा महाराष्ट्र दौरा; स्वामी समर्थांचे घेतले सपत्नीक दर्शन; जनतेच्या कल्याणाची केली प्रार्थना !

पैशांमुळे नोकरी मिळतेच, असे नाही

१. जाहिरातही प्रसिद्ध न झालेल्या पदांसाठी लोक भामट्यांना पैसे देऊ लागल्याचे आता उघड झाले आहे. पैशांमुळे नोकरी मिळतेच, असे नाही. काही प्रकार घडले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

२. दिवाळीनंतर आयोगाकडून कर्मचारी भरतीसाठी जाहिराती देणे सुरू होणार आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे. मुलाखतही घेतली जाणार नाही.

३. त्यामुळे नोकर भरतीत कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही आणि गैरप्रकार घडणार नाही, याविषयी युवा वर्गाने आश्वस्त रहावे.

Goa CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक; 40 दिग्गजांची यादी जाहीर!

कंत्राटी पदे भरण्यास मंजुरी

गोमेकॉ व शासकीय तंत्रनिकेतनात काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कनिष्ठ व वरिष्ठ श्रेणी सरकारी अधिकारी भरतीसाठी नियमांत बदल करण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी नमूद केले.

  • ०९ जणांच्या दृष्टीदोषावर शस्त्रक्रिया

  • १८ वर्षांखालील मुलांना लागतात चष्मे

  • ०२ लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी

  • ३३ हजार जणांची विशेष तपासणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com