CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी ऐकली सर्वसामान्यांची गाऱ्हाणी; साखळीतील रविंद्र भवनात भेटीगाठी

तत्काळ कार्यवाहीने नागरीकांचे समाधान
CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant:Dainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी त्यांच्या साखळी मतदारसंघात होते. यावेळी येथील रविंद्र भवनात त्यानी सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली. लोकांनाही त्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही झाल्याने समाधान वाटले.

CM Pramod Sawant:
Goa Land Grabbing Cases: गेल्या साडेपाच वर्षात राज्यात जमिन हडपल्याप्रकरणी एकूण 76 गुन्हे दाखल

दरम्यान, याआधी गोवा सरकारच्या वतीने सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले आहेत. त्यामध्ये प्रशासन तुमच्या दारी, सरकार तुमच्या दारी, जनता दरबार, हॅलो गोयंकार असे उपक्रम राबवले जात आहे. यातून सर्वसामान्यांच्या समस्या थेट सोडविण्यावर सरकारचा भर आहे.

जनता दरबार सारख्या उपक्रमांतून एकाच दिवसात अनेक समस्या मार्गी लावण्यात आलेल्या आहेत. तर हॅलो गोयंकार सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी १५ दिवसांत सोडविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत हॅलो गोयंकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतात. यामध्ये लोकांकडून येणाऱ्या शंका, समस्या नोंदवून घेऊन त्यांची स्वेच्छा दखल घेत तक्रारींचे निरसन करावे आणि त्याचा अहवाल 15 दिवसात द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आदेशात म्हटले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीर आज, शनिवारी स्वतः मुख्यमंत्रीच त्यांच्या मतदारसंघात होते. येथील रविंद्र भवनात त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकत त्या सोडविण्याबाबत कार्यवाही केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com