CM Pramod Sawant: साखळीत मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या जनतेच्या समस्या; तक्रारींवर तत्काळ कार्यवाही

राज्यभरातून आले होते नागरिक
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज, शनिवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीमध्ये होते. त्यांनी तिथे राज्यभरातून आलेल्या लोकांच्या समस्या ऐकल्या. ज्यांची सोडवणूक लगेच शक्य आहे तिथे संबंधितांना त्यांनी लगेचच तशा पद्धतीच्या सूचना केल्या.

CM Pramod Sawant
Goa Tourist: कळंगुट-बागा येथे मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा; कारच्या बॉनेटवर बसून, टपावर उभा राहून प्रवास...

दरम्यान, राज्यभरातून काही जण आज साखळीत आले होते. त्यांनी शासकीय कामांबाबतच्या आपल्या वैयक्तिक समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा तक्रारी, समस्या ऐकून घेतल्या. तसेच या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या.

मुख्यमंत्री सावंत अनेकदा साखळीत असा उपक्रम घेत असतात. या पूर्वीही साखळीतील अशा कार्यक्रमांतून अनेकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

त्यामुळेच संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्री अशा कार्यक्रमातून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम करत असतात आणि त्यातून लोकांचीही कामे होत असल्याने लोकांनाही समाधान वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com