CM Pramod Sawant| सुवर्णमहोत्सवी निधीचा वापरच नाही

मुख्यमंत्र्यांचा खुलासा: पंचायतींकडून प्रस्तावही नाहीत
Goa CM Pramod-Sawant
Goa CM Pramod-SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील अनेक पंचायतींकडून सुवर्णमहोत्सवी निधीचा वापर केला नसल्याचा खुलासा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. केंद्राकडून गोव्याला 300 कोटी रुपयांची निधी दिला गेला होता. त्यातून राज्यातील प्रत्येक पंचायतीला 50 लाख रुपये दिले होते, परंतु अनेक पंचायतींनी या निधीअंतर्गत प्रकल्पासाठी प्रस्तावदेखील सादर केले नाहीत, अशी खंत डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

(CM Pramod Sawant disclosed today that golden jubilee funds have not been used by many panchayats in goa state)

Goa CM Pramod-Sawant
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला

नवनिर्वाचित सरपंच आणि पंच सदस्यांसाठी ताळगाव येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत सचिव मिनीन डिसोझा, पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, मायकल डिसोझा उपस्थित होते.

पंचायत ही ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी स्थापित केलेली संस्था असून सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजना गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार याची खात्री पंच सदस्यांनी दिली पाहिजे. केवळ एका महिन्यात नंतर येऊन लोकांचे ना हरकत दाखले (एनओसी) हाताळून चालणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरपंच, पंचसदस्यांना कानपिचक्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नवनिर्वाचित सरपंच आणि पंच सदस्यांना कानपिचक्या मिळाल्या. सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर हा गावाच्या विकासासाठी करा, सरकारकडून अतिरिक्त निधीची अपेक्षा ठेवू नका. तसेच गावातील लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचतील याची खात्री करून घ्या. वैयक्तिक वैर बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव मांडून नंतर आमदाराने त्यात अडथळे आणल्याची कारणे देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com