CM Pramod Sawant : दिव्यांगांना रोजगारसंधी एनेबल इंडियाशी करार

मुख्यमंत्री : कौशल्य दिनी दिव्यांगांनाही घेणार सामावून
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant : राज्यात दिव्यांगजनांसाठी रोजगार संधींच्या निर्मितीसाठी आणि दिव्यांगांना उद्योग क्षेत्रांमधील कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य दिव्यांगजन आयोगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथील ‘एनेबल इंडिया’ या एनजीओशी सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्‍या.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर आणि एनेबल इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपेश सुतारिया यांनी या सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, समाजकल्याण संचालक अजित पंचवाडकर, आयोगाचे सचिव ताहा हाजिक, एनेबल इंडियाच्या संस्थापिका प्रमुख शांती राघवन उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa News - जीवाला धोका निर्माण करणारी झाडे तोडावीत - स्थानिक | Gomantak TV

सरकार सकारात्‍मक

दिव्यांगजनांसाठी विविध उद्योगांमध्ये, विविध पदांवर रोजगार संधी मिळण्यासाठी आवश्यक कौशल्ये, प्रशिक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट या सहकार्य करारामागे निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, हा करार म्हणजे कुशल मनुष्यबळ घडवणे आणि दिव्यांगजनांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याचा आपला दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.

CM Pramod Sawant
Panaji Crime : महिलांना फूस लावणारा 'दुपट्टा किलर’ महानंदची रवानगी पुन्हा कारागृहात

देशभर एनेबल इंडियाचे काम

एनेबल इंडिया ही बिगरशासकीय संस्था १९९९पासून ना-नफा तत्त्वावर कार्यरत आहे. दिव्यांगजनांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे आणि सन्मानाने समाजात त्यांना वावरण्याचे बळ मिळावे यासाठी ही संस्था काम करते. दिव्यांगजनांमधील रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामी देशातील अग्रणी संस्था म्हणून एनबेल इंडियाकडे पाहिले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com