Panaji Crime : महिलांना फूस लावणारा 'दुपट्टा किलर’ महानंदची रवानगी पुन्हा कारागृहात

१६ महिलांच्या खुनाचे गुन्हे नोंद
Mahanand Naik Goa
Mahanand Naik GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Crime : दुपट्टा किलर महानंद नाईक याची २१ दिवसांची फर्लोग मुदत संपल्याने आज संध्याकाळी पोलिस संरक्षणात त्‍याची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. कारागृहाबाहेर असताना त्याच्यावर पोलिसांनी नजर ठेवली होती. या काळात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या युवतीला पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

कारागृह अधिकाऱ्यांनी २१ दिवसांचा फर्लोग दिल्याने आरोपी महांद नाईक तब्बल १४ वर्षांनंतर प्रथमच कारागृहाबाहेर आला होता. त्याच्यावर १६ महिलांच्या खुनाचे गुन्हे नोंद होते. त्यापैकी दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला फर्लोग दिल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या युवतीने पोलिस संरक्षणासाठी अर्ज केला होता. तिला त्याने कारागृहातून धमक्या दिल्या होत्या अशी तिने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी तिला संरक्षण दिले होते.

Mahanand Naik Goa
Goa Monsoon Update 2023: रेड अलर्ट जारी; 9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार, आज शैक्षणिक संस्थांना सुटी

महानंद हा गरीब महिलांना हेरून त्यांच्याशी ओळख करत होता. त्यानंतर त्या महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पळून जाऊन विवाह करू असे सांगायचा. येताना या महिलांना तो दागिने घेऊन येण्यास सांगत असे व त्यांना निर्जनस्थळी नेऊन दुपट्‍ट्याने गळा आवळून त्यांचा खून करत असे. अंगावरील दागिने काढून मृतदेह निर्जनस्थळी टाकून देत असे. अनेक तरुणींनी त्याच्या भुलथापांना व आमिषाला बळी पडून आपला जीव गमावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com