पणजीत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्‍यानंतर सफाईचे काम सुरू

मनपाने शहरातील नाले आणि गटार सफाईचे काम हाती घेतले आहे.
Cleaning work started in many places in Panaji after water Blockage
Cleaning work started in many places in Panaji after water BlockageDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Road Block : गेल्‍या दोन दिवसांत पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे पणजीत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. शहरातील प्रमुख 18 जून मार्गावरील दुकाने आणि मळा येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना मन:स्‍ताप सहन करावा लागला. नाराज झालेल्या या लोकांनी त्‍यासाठी पणजी मनपाला जबाबदार धरले. त्यानंतर मनपाने शहरातील नाले आणि गटार सफाईचे काम हाती घेतले आहे.

Cleaning work started in many places in Panaji after water Blockage
गोव्यात नव्या 60 अंगणवाड्या सुरू करू : स्मृती इराणी

काल सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पणजीत पाणी तुंबले. 18 जून मार्ग पाण्याखाली गेल्याने लोकांची तारांबळ उडाली.

तसेच वाहतूक कोंडीही झाली. तर, मळा येथील फोन्‍तेहास परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हाल झाले. त्यानंतर आज सकाळी पावसाने किंचित विश्रांती घेतल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी शहरातील नाले आणि गटारांच्‍या सफाईचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com