Ganesha Idol : चिकणमातीच्या गणेशमूर्तीला आता 300 रु. अनुदान; हस्तकला महामंडळाचा निर्णय

Ganesha Idol : बैठकीत सांगेतील कुणबी गाव प्रकल्पावरही सविस्‍तर चर्चा
Ganesha Idol
Ganesha IdolDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesha Idol : मोरजी पुढील वर्षापासून चिकणमातीच्या गणेश मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराला प्रत्येक मूर्तिमागे ३०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय गोवा हस्तकला लघुउद्योग विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

यापूर्वी हे अनुदान प्रतिमूर्ती मागे रु. १०० होते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कठोर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अध्‍यक्ष प्रवीण आर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

काल शुक्रवारी पणजीत झालेल्या या बैठकीला हस्तकला विकास महामंडळाच्या संचालक संध्या कामत, जनरल मॅनेजर डॉम्‍निक फर्नांडिस, व्यवस्थापकीय संचालक मेल्‍विन वाझ, संचालिका आचल वेरेकर, प्रमोद कामत, मधू परब, सुबोध महाले, जयेश नाईक, महादेव गवंडी, सतीश कोरगावकर, लेखा विभाग प्रमुख श्याम नायक आदी उपस्थित होते.

Ganesha Idol
Goa Traffic Police: नाताळ-नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार; राज्यभरात 800 वाहतूक पोलिस तैनात

यावेळी महामंडळाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सांगे येथे हस्तकला कुणबी गाव प्रकल्पावरही चर्चा झाली. तसेच महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी चर्चा करण्यात आली.

राज्‍यातील पारंपरिक गणेश मूर्तिकारांना प्रोत्‍साहन मिळावे यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्‍यातील कलाकारांच्‍या उत्‍कर्षासाठी महामंडळ कटिबद्ध आहे.

- प्रवीण आर्लेकर, अध्‍यक्ष (गोवा हस्तकला लघुद्योग विकास महामंडळ)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com